कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्य गायब होण्याबाबत रुग्णालय दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:56+5:302021-06-09T04:19:56+5:30
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्य गायब होण्याबाबत रुग्णालय दक्ष दुसऱ्या लाटेत एकही तक्रार नाही : पहिल्या लाटेत घडल्या होत्या घटना लोकमत ...
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर साहित्य गायब होण्याबाबत रुग्णालय दक्ष
दुसऱ्या लाटेत एकही तक्रार नाही : पहिल्या लाटेत घडल्या होत्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जवळील साहित्य किंवा दागिने चोरीस जाण्याच्या तक्रारी दुसऱ्या लाटेत समोर आलेल्या नाही. पहिल्या लाटेत अशा काही घटना घडल्या होत्या. मात्र, आता रुग्णालयांनीच दक्षता ठेवत बाहेर याबाबत फलकच लावून ठेवलेला आहे. शिवाय मृत्यूनंतर एका अर्जावर नातेवाईकांची संमती घेऊन मृतदेह तपासूनच नंतरच पुढील प्रक्रिया केली जात असल्याने या घटना थांबल्याचे चित्र आहे.
जिल्हाभरात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर अनेक वेळा नातेवाईकांपर्यंत मृतदेह सोपिवण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बराच कालावधली लागत असतो, अशावेळी नातेवाईक जवळ असल्यास ही प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, तसे न झाल्यास मृतदेहाला शवविच्छेदनगृहात ठेवावे लागते. कोरोनाग्रस्तांवर अत्यंतसंस्काराचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार पूर्ण प्रक्रिया केल्यानंतरच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यात येतो. तोही प्रशासनाच्या शववाहिकेतून थेट स्मशानभूमितच मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचा चेहरा नातेवाईकांना दाखवून शववाहिका थेट स्मशानभूमितच जात असते. याठिकाणी काही नातेवाईकांना परवानगी असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो.
पुर्वी एक घटना आता दक्षता
१ पहिल्या लाटेत एका मृत महिलेचे कानातले चोरी गेल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली होती. या महिलेच्या कानातून हे दागिने ओरबडून काढून घेण्यात आले होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबधितांवर कारवाई झाली होती.
२ दुसऱ्या लाटेत एक घटना समोर आली होती. मात्र, यात तक्रार देण्यात आली नव्हती, एका महिलेच्या शरीरावरील दागिनेही ओरबडून काढण्यात आले होते. यात नातेवाईकांच्या संभ्रमामुळे रुग्णालय प्रशासनही पेचात पडले होते.
३ अशा घटना घडू नये म्हणून जीएमसी प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावरच याबाबत सूचना लावली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांनी ही सूचना लावली असून त्यानुसार रुग्णाजवळ कोणतीही मूल्यवान वस्तू देण्यात येऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी ही नातेवाईकांची राहिल, असे सांगण्यात आले आहे.
एकूण कोरोना रुग्ण
१४०९९४
बरे झालेले रुग्ण
१३५६०१
उपचार घेत असलेले
२८३८
कोरोनाग्रस्तांचे मृत्यू
२५५५
रुग्णालयांकडे प्राप्त तक्रारी
०१