यजमान धनाजीनाना महाविद्यालय सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 11:33 PM2017-01-17T23:33:02+5:302017-01-17T23:33:02+5:30

‘युवारंग २०१६’ : सहभागी संघांचा सराव,आकर्षक रंगमंचाची उभारणी, विविध समित्या कार्यरत

The hosted the college of Dhaniganjana | यजमान धनाजीनाना महाविद्यालय सजले

यजमान धनाजीनाना महाविद्यालय सजले

Next

फैजपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ‘युवारंग २०१६’ युवक महोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.  युवारंग महोत्सवाचे यजमानपद भूषविणाºया धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील ते  एकूण १७ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविणार आहे. त्यासाठी  सराव जोमाने सुरू आहे. धनाजी नाना महाविद्यालय व उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागातर्फे १९ ते २३ जानेवारी दरम्यान युवारंग युवक महोत्सव साजरा होत आहे. या युवारंगसाठी महाविद्यालय सज्ज झाले असून महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर मुख्य व्यासपीठ अर्थात रंगमंच असेल. त्यावर अडीच ते तीन हजार विद्यार्थी बसतील एवढा भव्य शामियांना लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  भोजन कक्ष, वैद्यकीय सेवा, अन्य सुविधांसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.  यजमानपद भूषविणाºया धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी   १७ कला प्रकार सादर करतील. त्यासाठी ४० विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे.विडंबन नाट्य, मुकनाट्य, मिमिक्री, समूहनृत्य, समूहगीत, सुगम गायन, लोकगीत, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्य वाचन, फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला, व्यंगचित्र, क्ले मॉडेलिंग, कोलाज या कला प्रकारांचा समावेश असेल. सहभागी विद्यार्थी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सराव  घेत आहे.  (वार्ताहर)

जेटीएमचे विद्यार्थीही सहा कला प्रकारात सहभागी होणार
४२०१३ मध्ये युवारंगचे यजमान पद भूषविलेल्या जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात विद्याथीर सहा कला प्रकारात युवारंग २०१६ मध्ये सहभागी होतील. त्यात कोलाज, स्पाट पेटिंग, रांगोळी, वक्तृत्व, वादविवाद, व बासरी वादन या कला प्रकारांचा समावेश असेल. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.सी.व्ही.चौधरी व प्रा.सपना चौधरी असतील.
आज दाखल होणार जिल्ह्याबाहेरील संघ
४युवारंग महोत्सवात उमवि कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संघ सहभागी होतील़ बुधवारी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील संघ दुपारनंतर दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
जळगावच्या
युवारंग मध्ये तीन पदके
४येथे होणारा १४ वा युवारंग युवक महोत्सव आहे. १३ वा युवारंग जळगावात झाला़ त्यात धनाजी नाना महाविद्यालयाला सुगम व शास्त्रीय गायन या कला प्रकारात दोन तर क्ले मॉडेलिंग मध्ये एक असे तीन पदके मिळाली होती.
'धनाजी नाना'त        होणार रोशणाई
४युवारंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात येणार असून एकूणच या ऐतिहासिक भूमीत होणाºया या तिसºया युवारंगमुळे तरुणाईचा उत्साह द्विगुणित होणार आहे.

Web Title: The hosted the college of Dhaniganjana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.