२०२० मध्ये राहिलेले चर्चित चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:39+5:302020-12-31T04:16:39+5:30

कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल असलेली भुसावळ येथील मालती नेहते ही वृद्धा बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिसात ...

Hottest faces left in 2020 | २०२० मध्ये राहिलेले चर्चित चेहरे

२०२० मध्ये राहिलेले चर्चित चेहरे

Next

कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल असलेली भुसावळ येथील मालती नेहते ही वृद्धा बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. या वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.भास्कर खैरे यांची बदली झाली होती.

डीनच्या खुर्चीवर डाॅन

जळगाव जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. जिल्हा प्रशासन टेन्शनमध्ये असताना तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांच्या बदलीचे आदेश निघाले. डाॅ. खैरे यांच्यानंतर आपणच डीन असल्याचा दावा करीत सहयोगी प्राध्यापक डाॅ. चंद्रशेखर डांगे यांनी अधिष्ठाता यांच्या खुर्चीवर बसून पाय पसरले. वर्षभरात तीन वेळा डाॅ. डांगे यांनी हा प्रकार केला. एकनाथ खडसे यांचे पक्षांतर

भोसरी येथील खुल्या भूखंडाच्या खरेदी प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर भाजपकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. वर्षभरात खडसे यांच्या पक्षांतराच्या बातम्या येत राहिल्या. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पक्षांतराच्या चर्चा सुरू असताना अखेर खडसे यांनी पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, माजी आमदार डाॅ. गुरुमुख जगवाणी यांच्यासह समर्थकांनी प्रवेश केला.

वाॅटर ग्रेस, सुनील झंवर प्रकाशझोतात

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबविले. या दरम्यान संस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे, ठेवीदार संघटनेचा पदाधिकारी विवेक ठाकरे याच्यासह लेखापरीक्षकांना आरोपी करण्यात आले. या दरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिले ते उद्योजक सुनील झंवर. त्यांच्या निवासस्थानाची व कार्यालयाची झडती घेतल्यानंतर या ठिकाणी वाॅटर ग्रेसची कागदपत्रे तसेच कर्मचारी यांंचे एटीएमकार्ड मिळून आले.

बीएचआर मविप्र व्हाया गिरीश महाजन

बीएचआरप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे लागेबांधे मराठा विद्या प्रसारक संस्थेसोबत असल्याचे समोर आले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील मालमत्ता घेतल्याचा आरोप झाला. त्यानंतर काही दिवसांत मराठा विद्या प्रसारक संस्था ताब्यात घेण्यासाठी गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून काही जणांनी आपले अपहरण करून चाकू लावल्याची फिर्याद ॲड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले.

Web Title: Hottest faces left in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.