महाराष्ट्र एक्सप्रेसचा वरणगाव स्थानकावर तासभर खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 03:56 PM2017-05-14T15:56:19+5:302017-05-14T15:56:19+5:30

रेल्वे रुळाशेजारीच वृक्ष पेटली असल्याचे रेल्वे कर्मचा:यांच्या लक्षात आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र एक्स्प्रेस वरणगाव रेल्वे स्थानकावरच थांबून ठेवण्यात आली होती.

An hour-long detention on the Varangaon station of Maharashtra Express | महाराष्ट्र एक्सप्रेसचा वरणगाव स्थानकावर तासभर खोळंबा

महाराष्ट्र एक्सप्रेसचा वरणगाव स्थानकावर तासभर खोळंबा

Next

ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 -  नाडगाव ते वरणगाव दरम्यान रेल्वे रुळाशेजारी दोन मोठे वृक्ष जळत असल्यामुळे सकाळी 8 वाजेच्या  सुमारास नागपूरकडे  जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेगाडी वरणगाव रेल्वेस्थानकावर  तासभर थांबून होती.  रेल्वे रुळाशेजारीच वृक्ष पेटली असल्याचे रेल्वे कर्मचा:यांच्या लक्षात आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र एक्स्प्रेस  वरणगाव रेल्वे स्थानकावरच थांबून ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिचा तासभर खोळंबा झाला. त्या दरम्यान रेल्वे फलाटावर पाणी व खाद्य प्रदार्थ उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. झाडाला लागलेली आग रेल्वे कर्मचा:यांनी विझविल्यानंतर गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली.

Web Title: An hour-long detention on the Varangaon station of Maharashtra Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.