वीज कनेक्शनअभावी निवासस्थाने धुळखात
By admin | Published: January 4, 2017 01:12 AM2017-01-04T01:12:30+5:302017-01-04T01:12:30+5:30
तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण होवून वर्षे झाले.
तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण होवून वर्षे झाले. केवळ वीज कनेक्शनअभावी ही निवासस्थाने धुळखात पडली असून, संबंधित कर्मचाºयांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेऊन मीटर उपलब्ध करून देण्याची अपेक्षा कर्मचाºयांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत तळोदा उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी सन २०१३ साली निवास स्थान मंजूर करण्यात आली होती. यासाठी शासनाने साधारण पावणे दोन कोटी रुपयेदेखील उपलब्ध करून दिले आहे. या निधीतून संबंधित ठेकेदाराने युद्ध पातळीवर कामाचे नियोजन करून सर्व निवास्थाने तयार केलीत. विशेष म्हणजे ही निवासस्थाने पूर्ण होऊन साधारण एक वर्ष झाले. तथापि वीज मीटरअभावी ही निवासस्थाने तशीच धूळखात पडली आहे. परिणामी हस्तांतरदेखील रखडले आहे. वास्तविक निवास स्थानांच्या हस्तांतरणासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने संबंधित सार्वजनिक विभागास अनेक वेळा पत्र दिले आहे. तथापि संबंधितांकडून त्यांना केवळ वायदेच दिले जात आहेत. याबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता धुळे विभागाच्या इलेक्ट्रीक्स विभागाकडे याप्रकरणी पाठपुरावा केला आहे. मीटरबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. शासनाने निवासस्थानासाठी करोडो रुपये खर्च केले असताना यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अजूनही कर्मचाºयांना निवासांपासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वीजपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)
कर्मचारी राहतात पडक्या इमारतीत
४काही कर्मचारी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत राहत आहेत. तथापि या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे अशा पडक्या निवासस्थानांमध्ये कर्मचाºयांना राहावे लागत आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाकडे कर्मचाºयांनी निवास स्थानांची मागणी केली होती, कर्मचाºयांची मागणी मान्य करत अखेर शासनाने तीन वर्षांपूर्वी निवासस्थाने मंजूर केले. ही निवासस्थाने बांधूनही पूर्ण झाले. मात्र वीज कनेक्शनअभावी वैद्यकीय अधिकाºयांनाही तेथे पूर्णवेळ राहणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने वीजपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.