आव्हाणे येथे वीज पुरवठा खंडित करुन घरांवर हल्ला
By admin | Published: June 6, 2017 11:19 AM2017-06-06T11:19:53+5:302017-06-06T11:19:53+5:30
नागरिकांची तक्रार : जिल्हाधिका:यांकडे मांडली कैफियत
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.6 : गावातील वीज पुरवठा खंडित करून आमच्या घरांवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर नेमके कोण त्यांच्या नावाची यादी आम्ही पोलिसांना दिली असून त्याप्रमाणे संबंधितांवर अटकेची कारवाई करावी अशी मागणी आव्हाणे येथील नागरिकांच्या एका गटाने जिल्हाधिका:यांकडे केली.
आव्हाणे येथे पूर्ववैमनस्यातून रविवारी दोन गटात वाद होऊन प्रचंड दगडफेक व कु:हाडीचा वापर करण्यात आला. यात काहीजण जखमी झाले आहेत. याप्रश्नी सोमवारी दुपारी 12 वाजता आव्हाणे गावातील एका गटाचे नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. त्यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिका:यांकडे निवेदन देण्यासाठी गेले.
पोलिसांकडून अन्याय झाला
घटना घडली त्यावेळी आमच्या गटातील नागरिकांबाबत पोलिसांची भूमिका ही पक्षपातीपणाची होती अशी तक्रार शिष्टमंडळातील कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली. गावातील दंगलखोर 10 ते 12 जणांचा बंदोबस्त करण्यात यावा. पंचनामा ज्या ठिकाणचा करायचा तेथील झालाच नसल्याची तक्रारही या नागरिकांनी केली.
गुलाबराव पाटील एकाच गटाला भेटले
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे रविवारी रात्री खाजगी गाडीने आव्हाण्यात येऊन गेले मात्र ते एका गटाला भेटले. आमच्याबाबतीत त्यांनी कोणतीही सहानुभूती दाखविली नाही, अशी तक्रारही या शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांकडे केली.
पोलीस प्रशासनाकडे दंगलखोरांच्या नावाची यादी दिली असून त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जावी, त्यांना अटक करावी अशी मागणी या नागरिकांनी केली. यावेळी वसंत सपकाळे, विनोद रंधे, गौतम सपकाळे, पराग कोचुरे, कल्पना वानखेडे, कविता सपकाळे, मुरलीधर सपकाळे, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.