पोलिसांना मिळणार हक्काचे घर

By admin | Published: February 26, 2017 12:52 AM2017-02-26T00:52:48+5:302017-02-26T00:52:48+5:30

जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून

The house of the police will get it | पोलिसांना मिळणार हक्काचे घर

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

Next

जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून मुख्यालयात कर्मचाºयांसाठी २ बीएचकेचे ९५२ तर अधिकाºयांसाठी ३ बीएचकेचे ५६ निवासस्थान यासह विविध कार्यालय व सुविधांसाठी २७५ कोटींचा प्रस्ताव आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांचे स्वप्न प्रत्यक्षात लवकरच साकार होणार आहे.हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करीत आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले होते.  
राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्यामार्फत हे प्रकल्प केले जाणार आहेत. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्या निवासस्थानासह डॉग युनीटसाठी १ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव असून त्यात पहिल्या टप्प्यात कार्यालयासाठी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.याच आवारात राखीव पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोध व नाशक पथकाचे कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय साकारले जाणार आहे. याशिवाय मोटार परिवहन कार्यालय, वर्कशॉप व ८२ चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र शेड उभारले जाणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.सुपेकर यांनी पुढाकार घेऊन हे प्रस्ताव मार्गी लावले.  

पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण 
पोलीस अधीक्षक कार्यालयाचेही नूतनीकरण केले जाणार असून त्यात कॉन्फरन्स व रेकॉर्ड रुम, मागील बाजूस तीन मजली इमारत उभारली जाणार आहे.
त्यात इमारतीत महिला तक्रार निवारण कक्ष, गुन्हे दोष सिध्दी कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखा, संगणक कक्ष, सीसीटीएनएस कार्यालय, मानव संसाधन विभाग, बिनतारी संदेश कक्ष, १०० व्यक्तींसाठी कॉन्फरन्स सभागृह, १०० जणांचा भोजन कक्ष आदी एकाच छताखाली येणार आहे.

कर्मचारी निवासस्थान, कार्यालये, नियंत्रण कक्षासह अनेक प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पोलीस दलाचा कायापालट होणार आहे. मुंबईतील बैठकीत सविस्तर आराखडा सादर झाला आहे.एकाच छताखाली सर्व कार्यालय येणार असल्याने नागरिकांची सोय होईल. या प्रकल्पासाठी सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरु होता. आपल्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागल्याने मोठे समाधान आहे. 
-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक

Web Title: The house of the police will get it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.