घरकूल प्रकरण : पाच जणांच्या जामीन अर्जावर १५ रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:10 PM2019-10-05T12:10:48+5:302019-10-05T12:13:28+5:30
देश सोडून न जाण्याची अट, जामीनावर दिवसभर चालला युक्तीवाद
जळगाव/औरंगाबाद : जळगाव घरकूल प्रकरणात आजी- माजी ३५ नगरसेवकांना जामीन मंज़ूर करण्यात आला. आता सुरेशदादा जैन, जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, आणि पी. डी. काळे आदींच्या जामीन अर्जांवर १५ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
घरकुल प्रकरणात नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी उच्च खंडपीठात दिवसभर युक्तीवाद झाला. सायंकाळी सर्व अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर सरकार पक्षाकडून शुक्रवारी युक्तीवाद पूर्ण करण्यात आला़ त्यानंतर जामीनावर निर्णय देऊन ३५ जणांचे जामीन अर्ज अटी-शर्तीवर मंजूर करण्यात आले़ जामीन मंजूर झालेल्या आरोपींनी देश सोडून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट नोटीस’ची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी खंडपीठास केली.
मात्र, लता भोईटे या रूग्णालयात असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर १८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
यांनी घेतले अर्ज मागे
शिक्षा सुनावल्यापासून रूग्णालयातच असलेले आरोपी कारागृहात जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जामीन अर्जांवर विचार केला जाणार नाही, असे खंडपीठाने खडसावताच मीना वाणी, अलका लढ्ढा, साधना कोगटा, विजय कोल्हे आणि सुधा काळे यांनी त्यांचे जामीन अर्ज गुरूवारी मागे घेतले.
यांनी पाहिले कामकाज
या प्रकरणात शासनातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण काम पाहत आहेत. त्यांना अॅड. विजय रवंदळ सहकार्य (असिस्ट टू पीपी) करीत आहेत. अपिलार्थी सुरेशदादा जैन यांच्यातर्फे अॅड. सत्यजित एस. बोरा, तर इतर अपिलार्थींतर्फे अॅड. महेश एस. देशमुख, अॅड. बी. आर. वर्मा, अॅड. जॉयदीप चॅटर्जी, अॅड. गिरीश वाणी, अॅड. आर. आर. मंत्री, अॅड. एन. एल. चौधरी, अॅड. किशोर संत, अॅड. व्ही. डी. सपकाळ, अॅड. परेश पाटील, अॅड. राजेंद्र देशमुख, अॅड. आबासाहेब शिंदे, अॅड. नीलेश घाणेकर, अॅड. मुकुल कुलकर्णी, अॅड. महेश पाटील, अॅड. विक्रम आर. धोर्डे, अॅड. अजित बी. काळे आणि अॅड. अभयसिंह भोसले, अॅड. विनोद पाटील आदी काम पाहत आहे़
अटी-शर्तींवर मिळाले जामीन
खंडपीठाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, विजय रामदास वाणी, अजय राम जाधव, चत्रभूज सोमा सोनवणे, कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, देविदास धांडे, दत्तू देवराम कोळी, डिगंबर दलपत पाटील, सुनंदा रमेश चांदेलकर, मिना अमृत मंधान, अशोक रामदास परदेशी, शिवचरण कन्हैय्या ढंढोरे, रेखा चत्रभूज सोनवणे, चुडामण शंकर पाटील, वासुदेव परशराम सोनवणे, इकबाल पीरजादे, मंजुळा धर्मेंद्र कदम, विमल बुधा पाटील, सुभद्राबाई सुरेश नाईक ,पुष्पलता शालिग्राम अत्तरदे, शांताराम चिंधू सपकाळे, लिलाधर नथ्थू सरोदे, अफजलखान रऊफखान पटवे, मुमताजबी हुसैन खान, निर्मला सुर्यकांत भोसले, सरस्वतीबाई रामदास कोळी, अरुण नारायण शिरसाळे, अलका अरविंद राणे, चंद्रकांत शंकर कापसे, डिगंबर दौलत वाणी, भगत रावलमल बालाणी, पांडूरंग रघुनाथ काळे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे़