भुसावळ येथे आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:49 AM2018-10-06T01:49:41+5:302018-10-06T01:50:29+5:30
प्रत्येकाला स्वत:चे घर असावे अशी इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला घर, पाणी, गॅस ही धोरणे सरकारने ठरविली आहेत. त्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.
भुसावळ, जि.जळगाव : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे अशी इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला घर, पाणी, गॅस ही धोरणे सरकारने ठरविली आहेत. त्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.
येथील लोणारी मंगल कार्यालयात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
व्यासपिठावर नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक किरण कोलते, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, सतीष सपकाळे, नगरसेवक युवराज लोणारी, किशोर पाटील, भाजपा महिला शहराध्यक्षा मीना लोणारी, माजी नगरसेवक दीपक धांडे, देवा वाणी, उपमुख्याधिकारी देशपांडे, नगर अभियंता पंकज उन्हाळे, प्रधानमंत्री आवास योजना मार्गदर्शक हिरालाल कोळी, प्रकल्प सल्लगार चेतन सोनार उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले.
नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरातील लाभार्र्थींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमाचा प्रयत्न आहे. सरकारी योजना आणता येतात. मात्र त्या पूर्ण करण्याची तळमळ असली तर जनतेसाठी योजना राबविली जाते. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी योजनांचा आलेला निधी परत नेण्याची वेळ आणली आहे. तसेच ४०० घरकुलांची योजना न्यायालयीन प्रक्रियेत अडकून ठेवली आहे.
प्रास्ताविकात नगरसेवक युवराज लोणारी यांनी, प्रभागातील भारत नगर, महात्माफुले नगरातील बहुतांश नागरिक योजनेचे लाभार्थी आहेत. घरकुल योजनांचे लाभार्थी सर्वेक्षण करण्यात येवून कुटुंब प्रमुखांना टोकन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रकल्प सल्लागार चेतन सोनार यांनी योजनेबाबत लाभार्र्थींना माहिती दिली. यावेळी प्रभागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले.