कर्मचारी निवडले कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:48+5:302021-01-17T04:14:48+5:30
जळगाव : कोविशिल्ड लसीचे अर्धापेक्षा कमी डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत याच लसीत दोनही डोस पूर्ण होतील ...
जळगाव : कोविशिल्ड लसीचे अर्धापेक्षा कमी डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत याच लसीत दोनही डोस पूर्ण होतील इतक्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन होते. मात्र, जीएमसीत डॉक्टर, परिचारिका सोडून अन्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. यात जिल्हा रुग्णालय आणि जीएमसी यातील कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव झाल्याचा सूर काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त झाला. आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनी भेट दिली. त्यांनीही लाभार्थ्यांची निवड कशी केली अशी विचारणा केली होती.
असे झाले नियोजन
प्रतीक्षालयात बारा तर निरीक्षण कक्षात १५ जणांची बसण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक खुर्चीमध्ये चार फुटांचे अंतर आहे.
निरीक्षण गृहात दोन बेड, ऑक्सिजन सिलिंडर, आपत्कालीन किट, औषधी, दोन इंजेक्शन भरलेलेच असे ठेवण्यात आले आहे.
असे होते कर्मचारी
सुरक्षारक्षक कल्पेश शिंपी स्क्रिनिंग करण्यासह नावे तपासत होता.
ॲपवर बापूसाहेब पाटील, ईशान पाटील, प्रदीप बाविस्कर हे कागदपत्र प्रमाणित करीत होते.
अधिपरिचारिका कुमुद जवंजार या लस देत होत्या.
औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. डॅनिअल साजी, डॉ. प्रदीप शेट्टी, डॉ. ऋषीकेश येऊल हे निरीक्षण कक्षात कार्यरत होते. परिचारिका जयश्री वानखेडे या नोंदणीपासून ते थेट निरीक्षण गृहात लाभार्थ्यांना नेण्यापर्यंतचे पूर्ण नियोजन करीत होत्या.
लसीकरण लाईव्ह
९.२० वा. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाहणी केली.
९.५० वा. यादीत पहिले नाव असलेल्या अमित वाघडे यांची स्क्रिनिंग झाली.
१०.०२ वा. आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनी भेट दिली.
१०.१४ वा. ॲप सुरू झाले.
११. ५ वा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आले.
११.१६ वा. अधिष्ठातांनी लस घेतली.
११. १८ वा. ते निरीक्षण कक्षात थांबले.
११. ३८ वाजेपर्यंत सात जणांना लस देण्यात आली होती.
११.५० वा. अधिष्ठाता निरीक्षणकक्षातून बाहेर गेले.
११.५२ वा. यादीत पहिले नाव असलेल्या अमित वागडे यांनी लस घेतली.
४.४९ वा. मोहन हटकर यांना लस टोचण्यात आली. त्यानंतर कुणीच आले नाही.