लॉकडाऊन असलेल्या अमळनेर, भुसावळाच्या तुलनेत कशी आहे जळगावची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:32 PM2020-07-13T12:32:33+5:302020-07-13T12:33:28+5:30

जळगाव : हॉटस्पॉट ठरलेले जळगाव , अमळनेर व भुसावळ या तीन शहरांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर ...

How is the condition of Jalgaon compared to Amalner, Bhusawal which is locked down | लॉकडाऊन असलेल्या अमळनेर, भुसावळाच्या तुलनेत कशी आहे जळगावची स्थिती

लॉकडाऊन असलेल्या अमळनेर, भुसावळाच्या तुलनेत कशी आहे जळगावची स्थिती

Next

जळगाव : हॉटस्पॉट ठरलेले जळगाव, अमळनेर व भुसावळ या तीन शहरांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता़ अमळनेर, भुसावळात लॉकडाऊन प्रभावी ठरला व सहा दिवसात दोन अंकीच रुग्णसंख्या राहिली़ तीनही शहरात या सहा दिवसात ५५६ रुग्ण आढळले तर एकट्या जळगावात मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव थांबलाच नाही. या लॉकडाऊनमध्येही ४१७ रुग्ण आढळून आलेले आहेत़
या कडक लॉकडाऊनमध्ये जळगाव शहरात सातत्याने ५० ते ९५ दरम्यान रुग्ण आढळून आले आहेत़ केवळ एका दिवशी २२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ तिकडे भुसावळ अमळनेरात मात्र, कधी १ ते ३९ सर्वाधिक असे रुग्ण आढळून आले आहे़ शिवाय अमळनेरात या कालावधीत एकही मृत्यू नसून भुसाळात तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन प्रभावी ठरल्याचे दिसते़
अमळनेरात सहा दिवसात एकही मृत्यू झालेला नाही. ही मोठी दिलासादायक बाब आहे़ जळगावात सात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ बरे होणाऱ्यांचे प्रमाण जळगावात अधिक असून १७० रुग्ण या लॉकडाऊनमध्ये घरी परतले़

Web Title: How is the condition of Jalgaon compared to Amalner, Bhusawal which is locked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव