आमच्या बापाचा पगार घेता तरी शेतक:यांशी उद्धटपणे कसे वागता?- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By admin | Published: May 12, 2017 02:08 PM2017-05-12T14:08:41+5:302017-05-12T14:08:41+5:30

आमसभेत गुलाबराव यांचा वीज कंपनीच्या अधिका:यांवर संताप

How do we behave rude on farmer while taking our father's salary? - Minister of State for Co-operation Gulabrao Patil | आमच्या बापाचा पगार घेता तरी शेतक:यांशी उद्धटपणे कसे वागता?- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

आमच्या बापाचा पगार घेता तरी शेतक:यांशी उद्धटपणे कसे वागता?- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

Next

 जळगाव,दि.12-  पगार आमच्या बापाचा घेता.. आणि तक्रार करायला, समस्या मांडायला आलेल्या शेतक:यांशी उद्धटपणे बोलता.. हा प्रकार सहन केला जाणार नाही. अशा उर्मट कर्मचा:यांना जळगावात राहू देऊ नका.. त्यांची तत्काळ कुठेही बदली करा., अशा शब्दात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जि.प.मध्ये आयोजित आमसभेत वीज कंपनीच्या अधिका:यांवर संताप व्यक्त केला. 

वीज कंपनीमधील अहिरे व पवार नामक परिचालक हे केळी उत्पादक शेतक:यांना माझी कुठेही तक्रार करा., कुणीच माङो काहीच करू शकत नाही., असे उर्मटपणे बोलतात. केळीला आता उन्हाळ्य़ात सिंचन झाले नाही तर लागलीच घड सटकतात. केळी खराब होते. हे नुकसान भरून देणार आहात का. जे कर्मचारी शेतक:यांशी उर्मटपणे बोलतील त्यांना जळगावात ठेऊ नका.. कुठेही त्यांची बदली करा. दुसरे परिचालक तातडीने नेमा, असे आदेशही गुलाबराव यांनी दिले. 
छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही आमसभा झाली. व्यासपीठावर गुलाबराव पाटील यांच्यासह जि.प.सदस्य पवन सोनवणे, पं.स.सदस्य नंदलाल पाटील, डॉ.कमलाकर पाटील, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी एस.पी.सोनवणे आदी होते. आमसभेला ठिकठिकाणचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पं.स. व तहसील कार्यालयातील विविध अधिकारी, कर्मचारी, वीज कंपनी, बांधकाम व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: How do we behave rude on farmer while taking our father's salary? - Minister of State for Co-operation Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.