पोलीस यंत्रणा गाफिल कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:33 PM2019-04-13T17:33:30+5:302019-04-13T17:36:22+5:30

 अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर मारहाण झाली. व्यासपीठावर बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्वत:च त्याची सुरुवात केली. इतकी मोठी घटना घडण्याआधी पोलीस यंत्रणेला संकेत कसे मिळाले नाहीत. पोलिसांची गोपनीय यंत्रणा नेमकी काय करीत होती? असा प्रश्न आता या निमित्ताने चर्चिला जात आहे.

How do you miss the police machinery? | पोलीस यंत्रणा गाफिल कशी?

पोलीस यंत्रणा गाफिल कशी?

googlenewsNext
ठळक मुद्दे विश्लेषणअमळनेरातील राडाभाजप व पोलीस यंत्रणेची नाचक्की

सुनील पाटील
जळगाव :  अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर मारहाण झाली. व्यासपीठावर बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्वत:च त्याची सुरुवात केली. इतकी मोठी घटना घडण्याआधी पोलीस यंत्रणेला संकेत कसे मिळाले नाहीत. पोलिसांची गोपनीय यंत्रणा नेमकी काय करीत होती? असा प्रश्न आता या निमित्ताने चर्चिला जात आहे.
माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यावर जो अश्लिल बोलण्याचा रोष होता. तो शब्द प्रयोग काही या मेळाव्यात झालेला नव्हता. त्याआधी पारोळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बी.एस.पाटील बोलले होते. त्यानंतर उदय वाघ गटात खदखद सुरु होती. अमळनेर येथे मेळावा होणार आहे व तेथे बी.एस.पाटील व उदय वाघ गटाचे कार्यकर्ते असणार. वाघ व डॉ.पाटील हे दोघंही व्यासपीठावर असणार हे देखील ठरलेले होते, मग पारोळ्यातील भाषणाची ठिणगी अमळनेरात पडू शकते याची कल्पना पक्षातील कार्यकर्त्यांना असताना पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेला का असू नये? की मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अर्थात वाघ व डॉ. पाटील यांच्यात अनेक दिवसापासून वितुष्ट आहे. भाजपच्या बैठकीत उदय वाघ यांनी डॉ.बी.एस.पाटील यांचा अपमान असो की, स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले लोकसभेचे तिकीट कापण्याचा विषय असो.. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी व नाराजी प्रचंड वाढलेलीच होती. दोन मंत्र्यांच्या समक्ष व तेही जिल्हाध्यक्षाकडून माजी आमदारालाच मारहाण होईल हे अपेक्षित नव्हते. कोणत्याही गोष्टीचे आधी संकेत मिळतात. तसे संकेत या वादाचेही मिळालेले होते, अशी चर्चा अमळनेरात आहे? मग असे असताना पोलिसांना का खबरदारी घेता आली नाही.. या प्रकरणामुळे भाजपची तर नाचक्की झालीच, पण पोलीस यंत्रणेच्या गोपनीय विभागाचेही पितळ उघडे पडले आहे.

Web Title: How do you miss the police machinery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.