भादली रेल्वे फाटक बंद केल्यास शेतात जायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2017 12:11 AM2017-01-10T00:11:40+5:302017-01-10T00:11:40+5:30
फाटक बंदच्या हालचाली : नशिराबादचे शेतकरी हवालदिल, विस्तारीकरणाला विरोध नाही, मात्र शेतक:यांना वेठीस धरणे गैर; भुयारी मार्ग तयार केल्यास गैरसोय दूर होणार
जळगाव-भुसावळ दरम्यान उभारण्यात येणा:या तिस:या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी या मार्गावरील भादली रेल्वे फाटक (फाटक क्रमांक 153) बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या संदर्भात भादली येथे बैठक देखील घेण्यात आली. मात्र या निर्णयामुळे नशिराबाद येथील शेतक:यांचा शेतात जाण्याचा मार्गच बंद होणार असल्यान शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे फाटक बंद करून जो पर्याय रेल्वे प्रशासनाने सूचविलेला आहे, त्यामुळे तब्बल आठ किलोमीटरचा फेरा पडणार आहे, शिवाय ही जागा रेल्वेच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे ती कधी हिरावली जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आहे त्याच मार्गावरून एक तर भूयारी मार्ग करून द्यावा अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. विस्तारीकरणाला विरोध नाही, मात्र शेतक:यांना वेठीस धरणे गैर असल्याचे या शेतक:यांचे म्हणणे आहे. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात ‘लोकमत’ चमूने प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन शेतक:यांशी चर्चा केली व तेथील स्थिती जाणून घेतली.
फाटक बंद संदर्भात भादली येथे झाली बैठक
जळगाव-भुसावळ दरम्यान वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे भादली रेल्वे फाटक व रेल्वे स्थानकावरही विस्तारीकरण होणार असल्याने येथील फाटक क्रमांक 153 बंद करण्याच्यादेखील हालचाली सुरू आहेत. या संदर्भात 10 डिसेंबर रोजी भादली येथे नाहरकत प्रमाणपत्रासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नशिराबादच्या शेतक:यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आठ गावांचा दळणवळणाचा मार्ग
हा रस्ता शेतक:यांच्या वापराचा तर आहेच शिवाय आठ गावांनाही जोडणारा मार्ग आहे. नशिराबाद येथून कडगाव, शेळगाव, भादली, सुजदे, भोलाणे, कानसवाडे, देऊलवाडे या गावांच्या नागरिकांची येथून ये-जा असते. त्यामुळे या गावाच्या दळणवळणालाही यामुळे बाधा होऊ शकते.
शेतात जाण्याचा मुख्य मार्ग
हे रेल्वे फाटक ज्या मार्गावर आहे तो प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 8 असून त्या मार्गानेच गेल्या शेकडो वर्षापासून नशिराबादच्या शेतक:यांचे शेतात येणे-जाणे आहे. नशिराबादच्या बहुतांश शेतक:यांची शेती या रेल्वे फाटकाच्या पलिकडे असून महामार्गावर भुसावळकडे जाताना नशिराबादपासून एक कि.मी. पुढे आल्यानंतर हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे.
ये-जा करण्यातच जाणार वेळ
या पर्यायी मार्गाने शेतात जायचे झाल्यास मोठा वेळ वाया जाईल. त्यामुळे शेतात पोहचणार केव्हा व व परत येताना पुन्हा लवकर निघावे लागणार असल्याने कामाचाही खोळंबा होईल. तसेच मजूरही एवढय़ा लांबच्या अंतराने येणार नाही. त्यामुळे शेती करावी कशी असा यक्ष प्रश्न या शेतक:यांपुढे उभा राहिला आहे. शिवाय हा रस्ता पूर्णपणे कच्चा असल्याने पावसाळ्य़ात त्याचा मोठा त्रास होऊन शेती माल व इतर साहित्य नेणे-आणणे कठीण होईल. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
भारनियमनाचे वेळापत्रक कसे पाळावे?
या परिसरात बागायती व कोरडवाहू अशी दोन्ही प्रकारची शेती असून शेतीसाठी रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयतच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री शेतात पिकांना पाणी द्यायला जावे लागते. सध्याचा रस्ता बंद करून जो पर्यायी मार्ग सुचविला आहे, त्या मार्गाने एवढय़ा रात्री कसे जाता येईल व त्यात वेळही खूप जाईल, असाही मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परिणामी शेती सोडण्याचीच वेळ रेल्वे प्रशासन, आणू पाहत आहे, असा आरोप केला जात आहे. येथील शेतक:यांना दिवसाही दोन ते तीन वेळा शेतात ये-जा करावी लागते. लांबच्या मार्गाने ते कसे शक्य होईल, असाही प्रश्न या शेतक:यांपुढे उभा आहे.
महामार्गावर जीव धोक्यात
पर्यायी मार्गाने जायचे झाल्यास महामार्गावरुनच बैलगाडी किंवा इतर साधनांनी जावे लागणार आहे. त्यामुळे महामार्गावर रहदारी तर वाढेलच शिवाय शेतक:यांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे मोठा धोका पत्करावा लागणार असल्याचेही शेतक:यांचे म्हणणे आहे.
पर्यायी मार्ग रेल्वेच्या मालकीचा
या शेतक:यांना वापरासाठी जो पर्यायी मार्ग दिला जाणार आहे, ती जागा रेल्वेच्या मालकिची आहे. त्यामुळे यापुढे आणखी विस्तारीकरण करताना ही जागा सुद्धा त्यात जाऊ शकते. परिणामी शेतात जायला मार्गच राहणार नाही, असा संभाव्य धोका असल्याचे सांगून या रस्त्याची डागडुजी कोण करणार, असाही प्रश्न शेतक:यांनी उपस्थित केला आहे.
भुयारी मार्ग करून द्यावा
हे रेल्वे फाटक बंद केल्यानंतर शेतक:यांपुढे प्रचंड समस्या उभ्या राहणार असल्याने त्यावर पर्याय म्हणून येथील शेतक:यांनी आहे त्याच मार्गावरुन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये रेल्वे फाटपासूनच भुयारी मार्ग करून द्यावा, जेणे करून जवळच्या मार्गानेच शेतक:यांना जाता-येता येईल व रेल्वेचाही उद्देश साध्य होऊ शकेल. या शिवाय याच ठिकाणी उड्डाणपुलाचाही एक पर्याय असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.
विरोध नाही, शेतक:यांचा विचार व्हावा
रेल्वेतर्फे करण्यात येणा:या या कामास विरोध नाही, मात्र यात शेतक:यांना वेठीस धरू नका, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. रेल्वेमार्फत येथे काम झाल्यास एक्सप्रेस गाडय़ा थांबतील, याचे स्वागतच आहे, मात्र त्याचा फटका शेतक:यांना बसू नये, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद करण्यापूर्वी शेतक:यांचा विचार करावा. तत्काळ निर्णय घेऊ नये, घेतल्यास मोठे नुकसान होणार आहे. या भीतीने शेतकरी त्रस्त आहेत.
रेल्वे फाटक बंद केल्यानंतर या परिसरातील शेतक:यांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुसरा पर्यायी मार्ग सुचविला आहे. हा पर्यायी मार्ग म्हणजे महामार्गावर नशिराबादपासून पुढे उड्डाणपुलार्पयत जावून तेथून या पुलाच्या खाली उतरत रेल्वे मार्गाला समांतर रस्ता देऊ केला आहे. सुचविलेल्या या पर्यायामुळे शेतक:यांना तब्बल आठ कि.मी.चा फेरा पडणार आहे. कारण महामार्गावरून जेवढे अंतर पुढे जायचे आहे पुन्हा तेवढेच अंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने मागे यावे लागणार आहे. यामध्ये मोठा वेळ वाया जाणार असून ज्या शेतक:यांकडे बैलगाडी नाही व जे पायी शेतात जातात, त्यांना याचा अधिक फटका तर बसणारच आहे, शिवाय बैलगाडी अथवा ट्रॅक्टरने जाणा:या शेतक:यांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे. यामध्ये वेळ, पैसा जास्त खर्च होऊन शेतक:यांना त्याची थेट झळ बसणार आहे.