माझ्यावर आरोप करणारा हॅकर खरा कसा- माजी मंत्री एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:27 PM2019-01-27T17:27:16+5:302019-01-27T17:29:12+5:30
ईव्हीएम मशीनमधील हॅकिंगची माहिती भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप एका हॅकरने केला, तर पक्ष (भाजपा) म्हणतो, हॅकर खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग माझ्यावर अंडरवर्ल्ड दाऊद व त्याची पत्नीसोबत संभाषण केल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केल्यावर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षीयांवर निशाणा साधला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चौकशीच्या ससेमिºयाला सामोरे जावे लागले, असे आपल्या मनातील शल्य खडसे यांनी व्यक्त केले
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : ईव्हीएम मशीनमधील हॅकिंगची माहिती भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप एका हॅकरने केला, तर पक्ष (भाजपा) म्हणतो, हॅकर खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग माझ्यावर अंडरवर्ल्ड दाऊद व त्याची पत्नीसोबत संभाषण केल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केल्यावर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षीयांवर निशाणा साधला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चौकशीच्या ससेमिºयाला सामोरे जावे लागले, असे आपल्या मनातील शल्य खडसे यांनी व्यक्त केले
प्रजासत्ताक दिनी फैजपूर पत्रकार संघाच्या भवनाचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित भरगच्च कार्यक्रमात खडसेंनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल खेद व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येसंदर्भात आरोप करणारा हॅकर खोटारडा तर माझ्यावर आरोप करणारा हॅकर खरा कसा, असा प्रश्न उपस्थित करत, एकाला एक तर दुसºयाला दुसरा न्याय कसा, अशी भावना व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोप करणाºया हॅकरच्या आरोपांचे पक्षातर्फे खंडन व गल्लीतील हॅकरवर विश्वास दाखविण्यात आला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याची खंतही त्यांनी वेळी व्यक्त केली.
व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष महानंदा होले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.