हावडा -मुंबईदरम्यान सोमवारपासून विशेष गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:29+5:302020-12-15T04:32:29+5:30
शिर्डीसाठी रात्री बससेवा सुरू करण्याची मागणी जळगाव : महामंडळाच्या जळगाव आगारातून रात्रीच्या वेळी शिर्डीसाठी बस नसल्यामुळे भक्तांची गैरसोय ...
शिर्डीसाठी रात्री बससेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : महामंडळाच्या जळगाव आगारातून रात्रीच्या वेळी शिर्डीसाठी बस नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होत आहे. रात्री अकाराच्या सुमारास बस उपलब्ध असली तर प्रवाशांना शिर्डीला पहाटेच दर्शनासाठी जाणे सोईस्कर होईल, त्यामुळे महामंडळ प्रशासनाने जळगाव आगारातून शिर्डीसाठी रात्री बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना मासिक पास देण्याची मागणी
जळगाव : शासनाच्या सूचनेनुसार शहरातील काही शाळा सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी शहरात येत आहेत. मात्र, एसटी बसला शैक्षणिक सत्रातील सवलत पास मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे खर्च इतर खासगी वाहनांनी जळगावला यावे लागत आहे. महामंडळाने शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मासिक पास देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी
जळगाव : शहरातील विविध रस्त्यांवर मनपाने वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी दुभाजक उभारले आहेत. मात्र, या दुभाजकांमध्ये प्रचंड कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. यामुळे दुभाजकांमध्ये शहराच्या सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेल्या झाडांवरही परिणाम होत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हे दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दिव्यांग सेनेच्या पाठपुराव्याला यश
जळगाव : नुकत्याच झालेल्या जागतिक दिव्यांगदिनी संघर्ष अपंग कल्याण संस्था व दिव्यांग सेनेतर्फे मनपासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर मनपा प्रशासनाने ३५० दिव्यांगांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये वर्ग करण्याचे मंजूर केले आहे, ३१ मार्चपर्यंत उर्वरित दिव्यांग बांधवांनाही ही मदत देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.