एचआरसिटी स्कोअर २३, ऑक्सिजन पातळी ५७, तरीही कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:10+5:302021-06-10T04:13:10+5:30
कोरोनाबाधित वृद्धावर यशस्वी उपचार, दोन महिन्यांनी परतले आजोबा घरी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पिंपळकोठा, ता. एरंडोल येथील कोरोनाबाधित ...
कोरोनाबाधित वृद्धावर यशस्वी उपचार, दोन महिन्यांनी परतले आजोबा घरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंपळकोठा, ता. एरंडोल येथील कोरोनाबाधित वृद्ध जीएमसीत दाखल झाले तेव्हा त्यांचा एचआरसिटी स्कोअर २३ आणि ऑक्सिजन पातळी ५७ होती, तरी देखील त्यांनी कोरोनावर मात केली. प्रतिकूल परिस्थितीतही डॉक्टरांनी त्यांच्यावर केलेल्या उपचारामुळे ते कोरोनामुक्त झाल्याची भावना त्यांच्या परिवाराने व्यक्त केली. त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
पिंपळकोठा येथील ६९ वर्षांच्या आजोबांना १५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मूत्राशयात देखील संसर्ग झाला. लघवी करण्यास देखील त्रास होत होता. त्यासाठी शल्य चिकित्सा विभागाच्या मदतीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना सात दिवस श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या निरीक्षणाखाली दोन महिने यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांना बुधवारी, ९ जून रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. बी. डी. नाखले, प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. इम्रान पठाण उपस्थित होते.
उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. डी. नाखले, प्रा.डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. नेहा चौधरी, डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. रोहन केळकर, डॉ. शाल्मी खानापूरकर, शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख व उपअधिष्ठता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. उमेश जाधव, डॉ. किरण अहिरे यांच्यासह परिचारिका शैला शिंदे, सुषमा तायडे, यश ढंढोरे, मालविका पाटील, शीतल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.