बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:38 AM2019-03-15T11:38:45+5:302019-03-15T11:39:32+5:30
घरात घेतले विष : कारण अस्पष्ट
जळगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रूक येथे ज्योती दीपक पाटील (२०) या तरुणीने राहत्या घरात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, ज्योतीे ही बारावीची विद्यार्थिनी होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांभोरी येथील दीपक रामकिसन पाटील हे मजुरी करतात. गुरुवारी दीपक व मुलगा दुर्गादास कापसाच्या गाडीवर कामाला गेले होते तर पत्नी रत्नाबाई या धरणगाव येथे स्वामी समर्थांच्या बैठकीला गेली होती. ज्योती ही देखील बैठकीला जायची, मात्र गुरुवारी तिने आईसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे घरी ती एकटीच होती.
सहकार राज्मंत्र्यांनी घेतली कुटुंबियांची भेट
ज्योतीचा मृत्यू झाल्याचे कळताच आई तसेच भावासह वडीलांनी कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात ज्योती हिच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. जिल्हापेठ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
आई घरी आल्यावर प्रकार उघड
आई रत्नाबाई धरणगाव येथील बैठकीहून दुपारी अडीच वाजता घरी परतली. घराचा दरवाजा उघडताच ज्योती बेशुध्दावस्थेत पडलेली दिसली. तिच्या तोंडातून फेस निघत असल्याचे पाहून शेजारी व नातेवाईकांच्या मदतीने तिला तातडीने धरणगाव येथील रुग्णालयात हलविले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले.