जळगाव मनपाच्या कर्जफेडीचा प्रस्ताव ‘हुडको’ने फेटाळला
By admin | Published: July 14, 2017 12:09 PM2017-07-14T12:09:15+5:302017-07-14T12:09:15+5:30
प्रस्ताव मान्य असल्याबाबत 15 दिवसात हुडकोला कळवावे असेही या प्रस्तावात नमुद आहे. याप्रकरणी आता न्यायालयात 26 जुलै रोजी कामकाज होणार आहे.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 14 - महापालिकेने दिलेला 77 कोटी 45 लाखांचा कर्जफेडीचा प्रस्ताव हुडकोच्या संचालक मंडळाने फेटाळून 391 कोटींच्या रकमेचा दावा करत ही रकम 9 टक्के व्याजदाराने फेडली जावी असा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयात हुडकोकडून 13 रोजी सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मान्य असल्याबाबत 15 दिवसात हुडकोला कळवावे असेही या प्रस्तावात नमुद आहे. याप्रकरणी आता न्यायालयात 26 जुलै रोजी कामकाज होणार आहे. मनपाने हुडकोकडून 1989-2001 या कालावधित विविध योजनांसाठी 141.38 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र काही कारणांमुळे मनपाला हे कर्ज फेडण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे 2004 मध्ये डिफॉल्ट रिझॉल्यूशन पॅकेज (तडजोडीचा प्रस्ताव) मंजूर करण्यात आला. त्यात मनपाने 15 वर्षात म्हणजेच डिसेंबर 2018 र्पयत कर्ज फेडण्यासाठी हप्ते ठरवून देण्यात आले. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपाचे हप्ते काही काळ थकल्याने हुडकोने 2004 चा तडजोडीचा प्रस्ताव रद्द करून टाकत डीआरटीत (डेबीट रिकव्हरी ट्रीब्युनल) दावा दाखल केला. डीआरटीने 340.74 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. त्यावर मनपाने डीआरएटीत अपिल करत या आदेशाला स्थगिती मिळविली आहे. तसेच मनपाने शासनामार्फत हुडकोला एकरकमी तडजोडीचा प्रस्तावही दिला होता.असा दिला होता हुडकोला प्रस्ताव कर्जफेडीच्या या प्रस्तावात मनपाने 77 कोटी 45 लाख देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रस्तावात 25 कोटींची रक्कम एकरकमी देण्याची तयारी दर्शविली होती. तसेच थकीत कर्जावरील व्याजाचाही या फेडीत अंतर्भाव करण्यात आला आहे. उर्वरित 52 कोटी 45 लाखांची रकम 3 वर्षे समान भरली जाईल असेही हुडकोला दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने हुडकोकडे सादरही केला होता.