सातपुड्यातील वनव्यामुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 06:01 PM2018-04-11T18:01:57+5:302018-04-11T18:01:57+5:30
आग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
बिडगाव, ता.चोपडा, दि.११ : सातपुड्यातील कुंड्यापाणी मोहरद हद्दीत दोन दिवसापूर्वी भडकलेल्या वनव्यामुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. ग्रामस्थ व वन कर्मचाºयांनी तब्बल बारा तास परिश्रम घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आली होती. यात लाखो रूपयांची वन संपती जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लावणाºयांविरूद्ध कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
सातपुड्यातील देवझीरी परिक्षेत्रातील वरगव्हान परिमंडळात येणाºया मोहरद शिवारातील कक्ष क्र.१५९ मध्ये ९ रोजी रात्री वनवा पेटला होता. हा वनवा इतका भयंकर होता की, तब्बल १५ ते १६ कि. मी. अंतरावरून तो धगधगतांना दिसत होता. देवझीरीचे आर.एफ.ओ.जैतकर वरगव्हान मंडळाचे वनपाल एस.डी.देवरे व तब्बल ३० कर्मचारी कर्जाना परिक्षेत्राचे १० कर्मचारी मोबाईल स्कॉड पथकाचे पाच कर्मचारी व बढाई बढवानी येथील ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
तीन दिवसांपूर्वीच मनुदेवी जंगलात आग लागुन मोठे नुकसान झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा लागलेल्या या आगीने लाखो रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाल्याने वनवा पुढे वनअधिकारी हतबल ठरतांना दिसत आहेत. वनवा पेटवणाºयांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.