‘सिव्हील’मध्ये पसरली प्रचंड दरुगधी

By admin | Published: February 17, 2017 01:13 AM2017-02-17T01:13:56+5:302017-02-17T01:13:56+5:30

चेंबरला लागली गळती : नाकाला रुमाल लावण्याशिवाय नाही पर्याय

Huge Durga spreads in 'Civil' | ‘सिव्हील’मध्ये पसरली प्रचंड दरुगधी

‘सिव्हील’मध्ये पसरली प्रचंड दरुगधी

Next

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाकडे जाणा:या जिन्यानजीक चेंबरला गळती लागल्याने या परिसरात प्रचंड दरुगधी पसरली असून येथून नाकाला रुमाल लावूनच रुग्ण, नातेवाईकांना ये-जा करावी लागत आहे. त्या शिवाय येथे बोलण्यासाठी तोंड उघडूच शकत नसल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढून उपचाराऐवजी आजाराचीच भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, रुग्णालय परिसरात इतरही ठिकाणी गळती लागल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिले असले तरी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णालयातच रुग्णांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. दुस:या मजल्यावर असलेल्या आंतररुग्ण विभागातील व आजूबाजूच्या परिसरातील शौचालयातील पाणी व मलमूत्र वाहून नेणा:या चेंबरला जिन्याच्या पायथ्याशीच गळती लागली आहे. यामुळे येथे घाण होऊन प्रचंड दरुगधी पसरली आहे.
नाकाला रुमाल लावून वावर
दुस:या व तिस:या मजल्यावर अपघात, जळीत व इतर कक्ष आहे. त्यामुळे येथे नेहमी रुग्णांची मोठी संख्या तर असतेच सोबतच त्यांच्या नातेवाईकांचे येणे जाणे सुरू                  असते.
 सतत ये-जा असलेल्या याच ठिकाणी नेमकी दरुगधी पसरल्याने त्याचा सर्वानाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
येथून येताना जाताना प्रत्येक जण नाकाला रुमाल अथवा कापड लावूनच जात आहे.
अडथळ्य़ामुळे गळती
चेंबरच्या पुढे पाईपांमध्ये अडथळा (ब्लॉक) निर्माण झाल्याने चेंबरनजीकच सर्व पाणी व मलमूत्र साचून तेथेच त्याची गळती होत आहे.
इतरही ठिकाणी गळती
जिल्हा रुग्णालय परिसरात अतिदक्षता विभागाच्या  (आयसीयू) मागे, जुन्या रक्तपेढी मागेदेखील पाईपांना गळती लागून तेथे पाणी साचत आहे. या शिवाय औषधी भांडारच्या मागे पाईप सडले असून शेवाळ लागले आहे.
पाण्याच्या कुपनलिकेजवळही गळती
जिल्हा रुग्णालयात असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या कुपनलिकेजवळही गळती असून शौचालयाचे पाणी या कुपनलिकेजवळ साचते. यामुळे येथील पाण्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होतो.


उपचारापेक्षा आरोग्याचाच प्रश्न
जिल्हा रुग्णालयात येणा:या रुग्णांवर उपचारापेक्षा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचाच येथे प्रश्न निर्माण होतो. गळतीमुळे डासांचे प्रमाण वाढून आजारी रुग्णांना दंश करणा:या डासांनी नातेवाईकांना दंश केल्यास आजाराचा फैलाव आरोग्याच्या जबाबदारी असलेल्या रुग्णालयातूनच होऊ पाहतआहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र
जिल्हा रुग्णालयातील गळती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देऊन दुरुस्ती करण्याविषयी कळविले आहे. मात्र निधी नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा रुग्णालयाला सांगितले. त्यामुळे हे काम रखडले आहे.
अत्यावश्यक सेवेबाबतही गांभीर्य नाही
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असली तरी सा.बां. विभागाकडून जिल्हा रुग्णालयातील  कामांबाबत गांभीर्य घेतले जात नसल्याचे बोलले जात आहे. निधी नसल्यास जिल्हाधिका:यांकडून अत्यावश्यक सेवेसाठी तो मंजूर करून काम करता येवू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे           आहे.
वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त
गेल्या पाच-सहा वर्षापासून जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त आहे. या पदावरून निरीक्षक निवृत्त झाल्यानंतर हे पद भरलेच गेलेले नाही.

Web Title: Huge Durga spreads in 'Civil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.