शेतकऱ्याच्या घराला भीषण आग, चार बकऱ्या अन् दोन बोकड ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:29 PM2021-05-10T13:29:22+5:302021-05-10T13:29:46+5:30
कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे.
पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घराला अचानक आग लागून गोठ्यातील चार बकऱ्या व दोन बोकड ठार झाले आहेत. तर, संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना विचखेडा ता. पारोळा येथे सोमवारी सकाळी ५ वाजता घडली. सुपडू एकनाथ सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या मालकीचे हे घर होते.
कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यातच, पारोळे येथील शेतकरी सुपडू सूर्यवंशी यांच्या घराला भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत शेतकरी सूर्यवंशी यांच्या संपूर्ण घराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने कुठलिही जीवितहानी झाली नाही.