मानवी स्वभाव, दैनंदिन जीवनातील घडणारे प्रसंग वर्णन करणारे ‘संध्याछाया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:38 PM2017-12-01T18:38:42+5:302017-12-01T18:41:38+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात प्रा.डॉ.सुधा खराटे लिखित ‘संध्याछाया’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय.
जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधा खराटे (पाटील) या अहिराणी लोकसाहित्याच्या अभ्यासक असून, आतार्पयत त्यांची कथा व ललित गद्याची दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ‘संध्याछाया’ हे ललित गद्य प्रकारचे दुसरे पुस्तक आहे. या संग्रहात टर्निग पॉईंट, शुद्ध बिजापोटी, म्हसकर आजी, भावबंध, संध्याछाया, आनंदकुंज, मातृभाव, सोरटी सोमनाथ, श्रम मेव जयते, विसराळू, आठवणीतील पाऊस, अवती-भवती, देवमाणूस, मूल-सर्वश्रेष्ठ गुरू व गमती-जमती अशा एकूण 15 ललित गद्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात व्यक्तीचित्रण, प्रवास वर्णन, मानवी प्रवृत्तीच्या विविध छटा, मानवी स्वभावाची वैशिष्टय़, दैनंदिन जीवनात घडणारे मनोरंजक प्रसंग इत्यादींचे मार्मिक चित्रण करण्यात आले आहे. ‘ग्रामीण-शहरी भागातील माणसं त्यांचा अनुभव सांगतात. ते अनुभव मी शांतपणे ऐकून घेते, श्रवण करणं ही एक कला आहे. यातून आपले अनेकांशी सूर जुळतात. माङयातील श्रवणभक्तीनं मला समृद्ध केलं, चिंतन, मनन व लेखन करायला प्रवृत्त केलं’, असा अनुभव लेखिका मनोगत व्यक्त करताना सांगतात. लेखिका : प्रा.डॉ.सुधा खराटे (पाटील), प्रकाशक : रोली प्रकाशन, पृष्ठे : 136, मूल्य 150 रुपये