आसोदा येथे उष्णतेमुळे शेकडो कासव मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:28+5:302021-05-24T04:15:28+5:30

वनविभागाने केला ४८ कासवांचा पंचनामा : जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळवित असताना झाली दुर्घटना लोकमत न्यूज नेेटवर्क जळगाव : जलवाहिनीच्या ...

Hundreds die in Asoda due to heat | आसोदा येथे उष्णतेमुळे शेकडो कासव मृत्युमुखी

आसोदा येथे उष्णतेमुळे शेकडो कासव मृत्युमुखी

Next

वनविभागाने केला ४८ कासवांचा पंचनामा : जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळवित असताना झाली दुर्घटना

लोकमत न्यूज नेेटवर्क

जळगाव : जलवाहिनीच्या कामासाठी नाला वळविल्याने त्यातील कासव बाहेर येऊन जलवाहिनीत गेले व उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील असोदा येथे घडली. दीडशे ते दोनशे कासव यामध्ये मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र वनविभागाने केलेल्या पंचनाम्यात ४८ कासव मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे.

ममुराबाद व परिसरातील शेतीसाठी बळीराजा योजनेंतर्गत पाणी देण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी आसोदा - आव्हाने रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असलेल्या लवकी नाल्याला वळविण्यात आले आहे. हा नाला वळविल्याने त्यातील काही कासव पाण्याबाहेर आले व ते जलवाहिनीत गेले. उन्हामुळे जलवाहिनी प्रचंड तापलेली असताना व त्यात तिला वेल्डिंग केले जात असल्याने उष्णतेमुळे कासव मृत्युमुखी पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याप्रकरणी वनविभागाच्या वतीने रविवारी वनरक्षक अश्विनी ठाकरे, डी.डी. पवार, रेवन चौधरी, सुनीत बाविस्कर (वन्यप्रेमी), आसोदा पोलीसपाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी जाऊन पंचनामा केला. त्यात ४८ कासव मृतावस्थेत आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ठिकाणी एक नाला असून, या नाल्यामधून ही कासवं बाहेर पडून उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मृत कासवांबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल पी. जे. सोनवणे यांच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

Web Title: Hundreds die in Asoda due to heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.