वीजतारांच्या शॉर्टसर्कीटमुळे साडेचार लाखांचा मका खाक
By admin | Published: April 24, 2017 12:16 PM2017-04-24T12:16:15+5:302017-04-24T12:16:15+5:30
मळणीसाठी तोडून पडलेल्या मक्याची कणसे आगीत खाक झाल्याने 4.50 लाख रुपयांचे नुकसान झाल़े
रावेर ,दि.24- शिवारातील विजय नाईक यांच्या मालकीच्या शेत गट नं 229 /1 मधील मळणीसाठी तोडून पडलेल्या मक्याची कणसे आगीत खाक झाल्याने 4.50 लाख रुपयांचे नुकसान झाल़े
रावेर शिवारातील शेत गट नं 229 /1 मध्ये आमोद वसंत महाजन यांनी नफ्याने केलेल्या विजय नाईक यांच्या शेतात रात्री लोंबकळणा:या वीज तारांच्या मध्ये शॉर्ट सर्कीट होवून लागलेल्या आगीत साडेचार एकर क्षेत्रातील मक्याचे उभे पीक जळून खाक झाले. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडल्याने पहाटे ही बाब उघड झाली़ त्यात मळणीसाठी तोडून ठेवलेल्या मक्याचे कणसांसह पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन संच जळून 4.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी वानखेडे यांनी केला.