अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे बंधाऱ्यात आढळले शेकडो मृत मासे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:48 PM2022-03-11T22:48:44+5:302022-03-11T22:49:44+5:30
मासे मरण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अमळनेर - जळगाव जिल्ह्याती अमळनेर तालुक्यात असलेल्या नंदगाव येथील बोरी नदीच्या बंधाऱ्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेकडो मृत मासे आढळून आले. हे मासे येथील के. टी. वेअर बंधाऱ्यात तरंगत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले.
शहरातील गटारी, नाल्याचे पाणी बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याने नदी पात्र दूषित झाले आहे. मासे मरण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील , नंदगाव येथील पृथ्वीराज पाटील, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. चौकशीसाठी पोलीस आणि तलाठी यांना घटनास्थळी पाठवले आहे. मृत मासे आणि पाण्याचा नमूना तपासण्यात येणार आहे.