जळगाव जिल्ह्यात १२ तालुक्यात पावसाची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:02 PM2020-09-07T12:02:16+5:302020-09-07T12:02:51+5:30

जिल्ह्यात १०७ टक्के पाऊस

Hundreds of rains in 12 talukas of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात १२ तालुक्यात पावसाची शंभरी पार

जळगाव जिल्ह्यात १२ तालुक्यात पावसाची शंभरी पार

Next

जळगाव : वरुणराजाच्या कृपीने यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पावसाचे टक्केवारी १०६.९ टक्क्यावर पोहचली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी ओलांडली असून उर्वरित चाळीसगाव, भडगाव, धरणगाव तालुक्यातही पाऊस नव्वदीच्या पुढे गेला आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर अधून-मधून चांगला पाऊस होत राहिला. जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाने दांडी मारली. त्यानंतर मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात पुन्हा चांगला पाऊस झाला. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची टक्केवारी शंभरीच्या पुढे गेली आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्क्यांमध्ये)
तालुका पाऊस
जळगाव १००.९
भुसावळ १०४.१
यावल १००.०
रावेर १०६.२
मुक्ताईनगर १२३.७
अमळनेर ११५.५
चोपडा १२२.५
एरंडोल १११.०
पारोळा १०२.३
चाळीसगाव ९६.०
जामनेर १०६.५
पाचोरा ११७.४
भडगाव ९४.५
धरणगाव ९१.१
बोदवड १०४.३
एकूण १०६.९

Web Title: Hundreds of rains in 12 talukas of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव