शेकडो सापांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:15+5:302021-08-14T04:21:15+5:30
खडकदेवळा, ता. पाचोरा : नुसता साप दिसला तरी प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून पळतात, तर काही ...
खडकदेवळा, ता. पाचोरा : नुसता साप दिसला तरी प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून पळतात, तर काही जण साप म्हणजे आपला शत्रूच म्हणून काठी घेत सापाला मारतात. पण पाचोरा येथील विजय शंकर पाटील या सर्पमित्राने आजवर शेकडो सर्पांना जीवदान दिले आहे.
वयाच्या चौदाव्या वर्षी पहिल्यांदाच इयत्ता नववीत शाळेत शिक्षण घेत असताना शाळेतच निघालेल्या सर्पाला पकडले होते, अन् त्यानंतर त्यांनी अठराव्या वर्षापासून ते आजतागायत ते बिनविषारी असो की कोब्रा जातीचा विषारी साप असो; त्याला नीडरपणे पकडण्याची कला विजय पाटील या सर्पमित्रास आहे.
ते गेल्या ३३ वर्षांपासून कार्यरत आहेत. इतकेच नाही तर साप दिसल्याचा नुसता फोन आला तरी तत्परतेने तेथे जाऊन साप पकडण्याचे कार्यही अगदीच मोफत करत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडोहून अधिक सापांना जीवदान दिले आहे.