चोरट्याने लांबविले दीड लाखाचे मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:51 AM2019-02-13T10:51:20+5:302019-02-13T10:51:47+5:30

तीन दुकाने फोडली

Hundreds of thieves have mobile phones | चोरट्याने लांबविले दीड लाखाचे मोबाईल

चोरट्याने लांबविले दीड लाखाचे मोबाईल

Next
ठळक मुद्दे संशयित ‘सीसीटीव्ही’त कैद


 संशयित ‘सीसीटीव्ही’त कैद
जळगाव : गोलाणी मार्केटमधील एका मोबाईल दुकानाचे कुलुप तोडून चोरट्याने १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचे १४ मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मध्यरात्री १२ .४० ते १२.४८ या या आठ मिनिटात त्याने हा गेम केला आहे. दरम्यान, शेजारील तीन दुकानेही फोडण्यात आली आहेत. तेथे चोरट्याला अपयश आले आहे.
अयोध्यानगरात राहणारे राज विजय महाजन यांचे गोलाणी मार्केटच्या सी विंगमध्ये गाळा क्रमांक २७४ माऊली मोबाईल’ हे दुकान भाड्याने घेतले आहे. सोमवारी रात्री ८ वाजता दुकान बंद केले. मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास गुरखा ललीत हा गस्त घालत असताना त्याला दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने याबाबत राज महाजन यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार महाजन यांनी ६ वाजता दुकानात येऊन पाहणी केली असता मोबाईल लांबविल्याचा लक्षात आले.
दोन दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न
माऊली मोबाईलजवळच बी विंगमध्ये असलेल्या शनशाईन माकेर्टींगच्या गोडावूनचे दुकान देखील चोरट्यांनी फोडले. परंतु दुकानात गॅस शेगड्या असल्याने काहीही चोरी झाली नाही. तसेच माऊली मोबाईलसमोरच सी विंगमध्ये निक्की माधवानी यांच्या मालकीचे ओंकार मोबाईल हे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाच्या शटरची दोन्ही कुलूपे तोडली. परंतु सेंट्रल लॉक न तुटल्याने दुकान उघडू शकले नाही. याप्रकरणी राज महाजन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाºयांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

८ मिनिटात केला चोरट्याने गेम
मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास शर्ट व पॅन्ट परिधान केलेला चोरट्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर त्याने प्रारंभी दुकानाचा गल्ला तपासला. मात्र त्यात कुठलीही रोकड नव्हती. त्यानंतर चोरट्याने दुकानातील १४ मोबाईल पिशव्यांमध्ये भरले. चार ते पाच पिशव्या हाता घेवून १२.४८ मिनिटांनी दुकानातून काढता पाय घेतला. यामध्ये ८० हजार रुपये किमतीचा एक महागडा मोबाईल आहे.

Web Title: Hundreds of thieves have mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर