लॉकडाऊनची उपासमार सहन होईना- व्यथा स्थलांतरितांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 03:40 PM2020-05-09T15:40:53+5:302020-05-09T15:42:46+5:30

परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे.

The hunger of the lockdown was unbearable | लॉकडाऊनची उपासमार सहन होईना- व्यथा स्थलांतरितांच्या

लॉकडाऊनची उपासमार सहन होईना- व्यथा स्थलांतरितांच्या

Next
ठळक मुद्देघरी जाण्याची परवानगी मिळेना जामनेरच्या परप्रांतीयांची व्यथा

मोहन सारस्वत/सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे. आणखी किती दिवस उपासमार सहन करायची, यापेक्षा गावाकडे गेलेलेच बरे, असा विचार करून परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज केले, मात्र प्रशासकीय अडचणींमुळे परवानगी मिळत नसल्याने हतबल झालेले कामगार निराश झाले आहे.
थंड पेय, पाणी पुरी विक्रेत्यांसह हॉटेल कारागीर असलेले परप्रांतातील सुमारे अडीच हजार कामगार जामनेर व ग्रामीण भागात अडकून आहेत. कानपूर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या या मजुरांना काम नसल्याने घराची ओढ लागली आहे. गावी परतण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली मात्र अद्याप काहीही उत्तर मिळत नसल्याने मजूर हतबल झाले.
परराज्यातील मजुरांच्या आधार कार्डावर पूर्ण नाव नसल्याने आॅनलाईन नोंदणीत अडचणी येत असल्याने त्यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचण सोडविण्याची मागणी केली.
शहरात उत्तर प्रदेश येथील भय्या लोकांचे थंड पेय विक्रीचे दुकान असून काही जण हातगाडी लावून व्यवसाय करतात. सुमारे २०० जणांचा यावर उदरनिर्वाह आहे. पाणीपुरी विकून चरितार्थ चालविणारे बिहार व कानपूर येथील काही कुटुंबीय लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक अडचणीत सापडले.
राजस्थान येथील फरसाण व मिठाई दुकानदार जामनेर, फत्तेपूर, नेरी, पहूर, शेंदुर्णी येथे आहेत. त्यांच्याकडे काम करणारे घराकडे जाण्यासाठी आतूर झाले आहे. आॅनलाईन परवानगी साठी अर्ज करून देखील प्रशासनाकडून काहीही हालचाल होत नसल्याने त्यांची तगमग वाढत आहे.
देशी दारू दुकान चालविणारे अांध्रप्रदेश येथील असून त्यांच्याकडे काम करणाºया मजुरांची संख्या सुमारे ५० असावी. दीड महिन्यापासून दुकान बंद असल्याने चरितार्थ कसा चालवावा याची चिंता त्यांना सतावत आहे.
घर व दुकानातील पीओपीचे काम करणारे परप्रांतीय मजूर शहरात कुटुंबांसह राहतात. काम सुरू होईल या आशेवर मजुरांनी गावाकडे जाणे टाळले.
तालुक्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कामगार सुरत, वापी येथे कामासाठी जातात. वीटभट्टीवर तर काही कारखान्यात काम करतात. मिळेल त्या वाहणारे हे मजूर गावाकडे परतत आहेत. जामनेरसह ग्रामीण भागात परतणाºया मजुरांना तपासणी करून गावात घेतले जात आहे. काही ठिकाणी मजुरांना शाळेच्या इमारतीत ठेवले जात असून, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. चिंचखेडे तवा या गावातील १४ कुटुंबीय सुरत येथून परतल्यानंतर त्यांनी गावाबाहेर शेतातच राहणे पसंत केले.

मध्य प्रदेशात पायी जाणारे मजूर रात्री भुसावळ अथवा मुक्ताईनगर मार्गे शहरातून जाताना दिसतात. एकत्रित जाणाºया मजुरांना जेवण पुरविण्यासाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदत करतात.

लॉकडाऊनपूर्वीच कुटुंबियांना घरी पाठविले. हॉटेलमध्ये काम करून रोजी रोटी मिळवितो, मात्र हॉटेल बंद असल्याने अडचण वाढली. घराची ओढ आहेच परवानगी मिळण्याची वाट बघतोय.
- दिवाकर कुमावत (मिस्तरी), नानंद, बिहार

थंड पेय विक्री बंद असल्याने सुमारे ४० कामगार बेरोजगार झाले. दीड महिन्यापासून घरातच आहोत. रोजगार नसल्याने घर खचार्ची चिंता वाढली आहे. कामगारांना घराकडे जाण्याची ओढ लागली मात्र परवानगी मिळत नाही.
-राहुल रामकीसन भय्या, थंडपेय विक्रेते, कानपूरवाले

दोन हजार प्रमाणपत्रांचे वाटप
परराज्यात जाणाºया सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले.
-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर

 

Web Title: The hunger of the lockdown was unbearable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.