शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:22+5:302020-12-15T04:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करावेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध संघटनांतर्फे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी बांधवांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे़ तीन कृषी कायदे रद्द करण्यात येत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शहरातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यात विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता़ शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. तसेच मान्यवरांनीही मार्गदर्शन केले़ सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची पदाधिकार्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
हे आहेत आंदोलनकर्ते
महाराष्ट्र राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष गफ्फार मलिक, लोक संघर्ष समितीचे सचिन धांडे, आंबेडकरवादी समितीचे मुकुंद सपकाळे, मराठा महासंघाचे सुरेंद्र पाटील, लेवा पाटीदार समाजाचे अमोल कोल्हे, मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, इकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार, रिझवान जागीरदार, मुक्ती हारून, प्रशांत नाईक, सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, रेखा देवकर, अंजली कुलकर्णी, शबाना खाटीक, कहेकशा अंजुम, प्रा. प्रीतीलाल पवार, प्रमोद पाटील, भरत कर्डिले, किरण वाघ, अयाज अली, श्रीकांत मोरे, सैय्यद रेहान, रामधन पाटील, खुशाल चौहान, नाना महाले, अली खलील बागवान, चंदन नवगिरे, राम पवार आदींचा आंदोलनात सहभाग होता.