पिठात स्फोटके ठेवून शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:21+5:302020-12-25T04:14:21+5:30
(मुख्य १ साठी) जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळील वनक्षेत्रात पिठात बॉम्बगोळे ठेवून वन्यप्राण्यांची शिकार केली जात ...
(मुख्य १ साठी)
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळील वनक्षेत्रात पिठात बॉम्बगोळे ठेवून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिसरात बिबटे, मोर व विविध सरीसृपांचा अधिवास आहे. मोठ्या प्राण्यांचा शिकारीसाठी हे गोळे ठेवण्यात येत असली तरी या बॉम्बगोळ्यांमुळे आठ दिवसांत चार श्वान व दोन रान डुकरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एक विद्यापीठ कर्मचारी श्वान फिरवित असताना स्फोटके असलेला पिठाचा गोळा खाल्याने श्वानाचा मृत्यू झाला. सुदैवाने कर्मचारी लांब असल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकारामुळे प्राणिमित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वन्यप्राण्यांचा शिकारीसाठी शिकाऱ्यांकडून विविध सापळे तयार केली जातात. मात्र, विद्यापीठ परिसरात पिठामध्ये स्फोटके ठेवून शिकार करण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. भीजविलेल्या कणकेच्या पिठात स्फोटके टाकून व त्या गोळ्याला मांस लावून त्या साह्याने शिकार केली जात असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी दिली आहे.