रस्त्यांच्या कामामुळे अडथळयांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:28 AM2019-01-13T11:28:03+5:302019-01-13T11:28:16+5:30
औरंगाबाद, अकोला व चाळीसगावसाठी लागतात दीड ते दोन तास जादा
जळगाव : जिल्ह्यातून जाणारा जळगाव ते चिखली या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद व जळगाव ते मनमाड या दोन रस्त्यांचे रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक भागात नागरिकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो आहे. या कामांमुळे जुन्या मार्गाची साधी दुरूस्तीही होऊ न शकल्याने मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
या सर्व गोंधळामुळे जळगाव ते औरंगाबादला आणि जळगाव ते चाळीसगाव जाण्यासाठी तीन तासांऐवजी चार ते साडेचार तास तर अकोला जाण्यासाठी चार ऐवजी पाच तास लागत आहे. त्यामुळे हा प्रवास आता कंटाळवाणा तितकाच जिकरीचा बनला आहे.
राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यात तरसोद ते चिखली व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे आहेत. यातील तरसोद ते चिखली या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापांसून गतीने सुरू आहे. तर तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या मार्गाचे काम ठेकेदाराला आलेल्या काही अडचणींमुळे बंद पडले आहे. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजुंनी साडेसात-साडेसात मिटरचे दोन मार्ग आहेत तर आत दुभाजक असेल. दोन्ही टप्प्यात चौपदरीकरणाची रूंदी अशीच असेल केवळ जळगाव ते भुसावळ दरम्यान वाहतूक जास्त असल्यामुळे दोन्ही बाजुंनी दहा-दहा मिटरचा रस्ता असेल. या दोन्ही मार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवले वाहतुकीची कोंडी होत आहे.
औरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तास
जळगाव ते औरंगाबाद मार्ग दुहेरीकरणासाठी खोदण्यात आला आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव ते औरंगाबाद हे १६० किलोमीटरचे अंतर असून,एस.टी.टॅव्हल्स व रुग्णवाहिका यांना हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी तीन ते साडेतीन तास लागायचे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे हे अंतर पार करण्यासाठी साडे चार ते पाच तास लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम, खडी-मुरुमचे पडलेले ढिगारे, सिमेंटचे पाईप व वाहनामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनधारकांना अतिशय संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. प्रचंड उडणाºया धुळीमुळे तर चालकांना समोरचे अस्पष्ट दिसत असल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
चाळीसगाव, अकोल्याकडे जाण्यासाठींही एक ते दीड तासांचा विलंब
जळगावहुन चाळीसगाव, धुळे, व अकोला या राष्ट्रीय मार्गांवरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये धुळ्याचे काम बंद असले तरी, चाळीसगाव व अकोला या रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये जळगाव ते चाळीसगावचे अंतर १०२ किलोमीटर असून, तीन तासांऐवजी ४ तास लागत आहे. जळगाव ते अकोला १८० किलोमीटरचे अंतर या ठिकाणी जाण्यासाठी बसला ५ तासांऐवजी सहा तास लागत असल्यााचे एस.टी, रुग्णवाहिका व ट्रॅव्हल्सच्या चालकांनी सांगितले.
जळगाव-औरंगाबाद मार्ग खिळखिळा
जळगाव -औरंगाबाद हा राज्य मार्ग आहे. त्याच पद्धतीने जळगाव ते चाळीसगाव व पुढे मनमाड हादेखील राज्य मार्ग आहे. दोन्ही बाजुंनी पाच-पाच मिटरने हे काम या रस्त्यांवर सुरू आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्याचे डांबरीकरण ते जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर खराब झालेल्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी केली जात तीदेखील यंदा होऊ शकलेली नाही.
अतिरिक्त भत्ता देण्यात यावा
जळगाव आगारातून औरंगाबाद, चाळीसगाव, अकोला या मार्गावर दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बस फेºया सुरु असतात. बस निघाल्यानंतर औरंगाबाद येथुन सात तासात परत तर धुळ््याहुन सहा व चाळीसगावहुनही सहा तासात परत व्हावे. असे प्रत्येक चालकाला वेळेचे वेळापत्रक ठरवुन दिले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दिलेल्या वेळेपत्रकापेक्षा दररोज दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने, एसटीच्या चालकांनी जादा कामाचा अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी विभागनियंत्रकांकडे केली आहे. गेल्या आठवड्यातच संयुक्त कृती समितीचे अध्यळ गोपाळ पाटील तर महाराष्ट्र एस.टी वर्कस काँग्रेस(इंटक)तर्फे संदीप सुर्यवंशी यांनी केली आहे.