धानोरा बुद्रुक येथे पती-पत्नीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:34+5:302021-03-20T04:15:34+5:30
जळगाव : धानोरा बुद्रुक येथे संगीत समाधान पारधी (वय ३०) व तिच्या पतीस रामा साहेबराव पारधी, ईश्वर ...
जळगाव : धानोरा बुद्रुक येथे संगीत समाधान पारधी (वय ३०) व तिच्या पतीस रामा साहेबराव पारधी, ईश्वर रामा पारधी तसेच चेतन रामा पारधी या तिघांनी लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारदान गोडाऊनला आग
जळगाव : एमआयडीसी येथील रहिवासी सत्यनारायण रामप्रताप बालदी यांच्या आमदार धंदा गोडाऊनला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. या आगीमध्ये सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद झाली आहे. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
गणेश कॉलनी भागात रस्त्याची दुरुस्ती
जलगाव : गेल्या काही महिन्यांपासून शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी गणेश कॉलनी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याप्रमाणे शहरातील इतर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दुचाकी घसरून होऊ शकतो अपघात
जळगाव : पिंप्राळा रिक्षा स्टॉपकडून बाजार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची थातुरमातुर दुरुस्ती करण्यात आली. दगड-खडींचा वापर करून खड्डा बुजविण्यात आल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.