मिनी मालवाहूच्या धडकेत पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:02 PM2019-08-26T18:02:15+5:302019-08-26T18:02:25+5:30

पत्नी वनरक्षक : सहस्त्रलिंगनजीक घटना

 Husband and wife killed in the collision of a mini freight | मिनी मालवाहूच्या धडकेत पती-पत्नी ठार

मिनी मालवाहूच्या धडकेत पती-पत्नी ठार

Next


पाल ता रावेर : येथून काही अंतमरावरील सहस्त्रलिंगजवळ मालवाहून मिनी ट्रक व दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात पाल येथील वन विभागाच्या वनरक्षक ममता हेमंत पाटील (वय २९) व त्यांचे पती हेमंत उत्तम पाटील (वय ३२) हे दोघे ठार झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.
दोघे पती-पत्नी गाडीवर रावेरहून आपले शासकीय काम आटोपून पालकडे येत असताना प्रादेशिक वन विभाग नर्सरी जवळ मालवाहू मिनी ट्रकने (क्रमांक एमपी १० जी २१०५) दुचाकीस (एम.एच. १९ डीजे ३११२) जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, ममता हेमंत पाटील या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती हेमंत पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाकरितासाठी नेत असताना रत्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मिनी ट्रकचालक फरार
हा अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी जमू लागल्याचे पाहून ट्रक चालकाने तेथून पळून गेला.
मुलीसाठी घेतलेली फळ विखुरली
ममता हेमंत पाटील या प्रादेशिक वन विभाग रावेर अंतर्गत निमड्या येथे गेल्या तीन वषार्पासून वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. रावेरहून निघताना त्यांनी मुलीसाठी खाऊ म्हणून सफरचंद घेतले होते. अपघातस्थळी हे सफरचंद विखुरले होते.
घटनेची माहिती मिळताच पाल येथील पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राजेंद्र राठोड हे तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. ममता पाटील यांचे माहेर अमळनेर येथील असून त्यांचे पती हेमंत पाटील हे मुळचे कासारखेडा, ता. यावल येथील रहिवासी आहेत.
दोघाचे मृतदेह रावेर येथे हलवून तेथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वन विभागातील अधिकारी वर्ग हजर होता.

Web Title:  Husband and wife killed in the collision of a mini freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.