महिला वाहकावर पतीचा चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 03:44 PM2020-01-06T15:44:19+5:302020-01-06T15:44:30+5:30
जळगाव : नाशिक येथील ड्युटी संपवून परतलेल्या महिला वाहकावर पतीने कौटुंबिक वादातून चाकू हल्ला केला. यात महिला वाहक जखमी ...
जळगाव : नाशिक येथील ड्युटी संपवून परतलेल्या महिला वाहकावर पतीने कौटुंबिक वादातून चाकू हल्ला केला. यात महिला वाहक जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ यात महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. नंदा वसंत बाविस्कर (वय-२९, रा़ खोटेनगर) असे त्या महिलेचे नाव आहे़ तर मिलिंद आनंदा वारडे असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव असून तो फरार आहे़
खोटेनगर येथे नंदा बाविस्कर या कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ एस.टी. महामंडळात त्या महिला वाहक म्हणून नोकरीला असून काही महिन्यांपूर्वीचं त्यांची चोपडा आगरातून जळगाव आगारात बदली झाली आहे़ दरम्यान, त्यांचे लग्न चहार्डी येथील मिलिंद आनंदा वारडे यांच्याशी झाले होते़ गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दोघेही विभक्त राहत आहे़ रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नंदा ह्या नाशिक येथून ड्युटी संपवून जळगाव बसस्थाकावर आल्या़ बसमधून उतरत असताना त्यांना पती मिलिंद हा समोर दिसला़ त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलत असताना अचानक पती मिलिंद याने नंदा यांच्या कानाजवळ चाकूने हल्ला केल्या़ त्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या़ यानंतर काही क्षणातचं पती हा त्याठिकाणाहून पसार झाला़
बसस्थानकावर उडाली धावपळ
महिला वाहकावर चाकू हल्ला झालेला पाहून बसस्थानकावर धावपळ उडाली़ त्यानंतर ही घटना आगार व्यवस्थापक नीलेश पाटील व स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांना कळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली़ त्याचबरोबर विविध एस़टी़संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी आले.
जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
एस़टी़ महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी महिला वाहन नंदा बाविस्कर यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून पोलिसांकडून जबाब नोंदवून घेण्यात आले़ दरम्यान, महिला वाहकाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले़ याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून पतीचा शोध घेतला जात आहे़