पत्नीच्या साडीने पतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:08 AM2019-02-20T11:08:09+5:302019-02-20T11:09:09+5:30
नैराश्यातून संपविले जीवन
जळगाव : घरची आर्थिक परिस्थती अचानक खालावल्याने कजार्चा वाढता डोंगर व त्याची कर्जफेड कशी करावी याा विवंचनेत तालुक्यातील खेडी ब्रुदूक येथील बाळू तुकाराम कोळी (वय ५०) यांनी बाथरुममध्ये पत्नीच्या साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
मूळ रावेर तालुक्यातील चोरवड येथील रहिवासी बाळू तुकाराम कोळी हे रोजगारासाठी २० वषार्पूर्वी खेडी बुद्रूक येथे स्थायिक झाले आहे. ठिबक सिंचनासाठी लागणारे फिल्टर बनवून त्याची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.
शेजाऱ्यांनी घेतली धाव
पत्नी वंदनासह मुलांनी शेजारी रहिवाशांना हा प्रकार धावत जाऊन सांगितला. पोलीस पाटील भिका अहिरे यांनी ग्रामस्थासह घटनास्थळ गाठले. दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर मृतदेह उतरविण्यात येवून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी जिल्हा रूग्णालयातही गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच रतीलाल पवार यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरात सर्व असताना घेतला गळफास
बाळू तुकाराम कोळी यांची पत्नी तसेच दोन्ही मुले घरीच होते. आर्थिक परिस्थितीमुळे सतत विचारात असलेले कोळी हे घरातील बाथरूमध्ये गेले. तेथेच त्यांनी गळफास घेतला. बराच वेळ पासून बाथरुमध्ये गेलेले कोळी बाहेर का येत नाही, पत्नी वंदना हिने पाहिले असता, दरवाजा आतून बंद होता. त्यांनी आवाज देऊन पाहीला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. जोराने आवाज देवूनही आतून उत्तर मिळत नव्हते. मुलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना प्रकार समोर आला. हा प्रकार पाहून मुलांना धक्का बसला होता. कोळी यांनी साडी बाथरुमच्या खिडकीला बांधून गळफास घेतल्याचे लक्षात आले.