हाच पती लाभू दे जन्मो-जन्मी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 07:48 PM2018-06-27T19:48:52+5:302018-06-27T19:55:09+5:30

जळगाव शहरात बुधवारी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पती-पत्नींचे नाते सात जन्म टिकावे यासाठी वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीघार्युष्यासाठी प्रार्थना केली.

This is the husband who gives birth to birth-born! | हाच पती लाभू दे जन्मो-जन्मी !

हाच पती लाभू दे जन्मो-जन्मी !

Next
ठळक मुद्देपूजेसाठी सकाळपासून सुवासिनींची गर्दीवटपौर्णिमेच्या निमित्ताने दिला पर्यावरण जतन करण्याचा संदेशशहरातील विविध मंदिर परिसरात महिलांची गर्दी

जळगाव- शहरात बुधवारी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पती-पत्नींचे नाते सात जन्म टिकावे यासाठी वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीघार्युष्यासाठी प्रार्थना केली. ओंकारेश्वर मंदिर, चिमुकले श्रीराम मंदिर, पिंप्राळा परिसर, एमआयडीसी तसेच रामनंदनगर परिसर यासह शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
पुजेदरम्यान वडाच्या झाडाला सुवासिंनींनी सात फेरे मारीत धागा बांधला. त्यानंतर उपस्थित ब्राह्मणांना दान-दक्षिणा देत इतर सुवासिनींनी सौभाग्याचं लेणं हळदी-कुंकू लावून,आंब्यांचे वाण देऊन ओट्या भरल्या. सायंकाळपर्यंत वडाचे झाड असलेल्या ठिकाणी सुवासिनींची पुजेसाठी गर्दी झालेली होती़
वटपौर्णिमेच्या निमित्ताने दिला पर्यावरण जतन करण्याचा संदेश
पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे बुधवारी ५ मंदिरात व विद्या इंग्लिश स्कूल येथे वडाचे रोप लावण्यात आले. या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊन ५ रोपे सुवासिन महिलांना वाणाच्या रुपात देण्यात आली. यावेळी वैशाली पाटील, अनुराधा रावेरकर, वंदना चावरे, गायत्री कुलकर्णी, हेमा माहेश्वरी, सविता महाजन निलोफर देशपांडे , सरिता खाचने, स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या.

Web Title: This is the husband who gives birth to birth-born!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव