जळगावातील शिवधाम मंदिराजवळ झोपडीला आग
By admin | Published: May 29, 2017 04:41 PM2017-05-29T16:41:10+5:302017-05-29T16:41:10+5:30
संसारोपयोगी वस्तू खाक : वॉचमनचे कुटुंब अंगणात झोपल्याने बचावले
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29 - शिवधाम मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाच्या ठिकाणी वॉचमनच्या झोपडीला मध्यरात्री अचानक आग लागली. झोपडीतील कुटुंब बाहेर झोपल्यामुळे त्यांना कोणतीच इजा झाली नाही, मात्र या आगीत गहू व पॅँटच्या खिशातील 2 हजार रुपये व अन्य संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद झाली आहे.
शिवधाम मंदिराला लागून असलेल्या गजानन कॉलनी जवळ बांधकाम सुरूआहे. त्याठिकाणी राम भरोस नगराज बंजारा हे वॉचमन म्हणून काम करीत आहेत़ या बांधकामाजवळच त्यांची झोपडी आह़े मध्यरात्रीच्या सुमारास अचाकन झोपडीला आग लागली़ त्यात आगीत घरातील 750 रुपये किंमतीचे गहू व पॅण्टच्या खिशात ठेवलेले 2 हजार रुपये, कपडे, प्लास्टीकचे भांडे यासह अन्य किरकोळ संसारोपयोगी सामान जळून खाक झाला़ आगीचे कारण समजू शकले नाही. आग लागल्याचे कळताच बंजारा कुटुंबीयांनी पाणी टाकून आग विझविली.