बोंडअळीमुळे संकरीत कापूस संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:35 PM2017-09-21T17:35:45+5:302017-09-21T17:43:00+5:30
अचानक ढगाळ आणि धुक्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील संकरीत कापसावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे.
लोकमत ऑनलाईन न्यूज चोपडा : तालुक्यात यावर्षी निम्मेपेक्षा जास्त कृषीक्षेत्रावर संकरित कापसाची लागवड झाली आहे. यंदा सुरूवातीला ब:यापैकी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली असली तरी मात्र संकरीत कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. कधी नव्हे एवढ्या मोठय़ा प्रमाणात लागवड असलेल्या कापसाची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल होऊन बोंड अळीने कापसावर आक्रमण केले आहे. ही बोंड अळी प्रौढ अवस्थेत गेल्यामुळे कोणत्याही औषध फवारणीने तिच्यावर नियंत्रण येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुका कृषी कार्यालयामार्फत आणि कृषी सहाय्यकामार्फत गावागावांमध्ये या अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. विशेषत: चहार्डी परिसरात मोठय़ा प्रमाणात या ठिपक्याच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी कार्यालयाकडून कधी मार्गदर्शनपर माहिती मिळते याकडे शेतक:यांचे लक्ष लागले आहे. चोपडा तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र 79770 हेक्टर तर पेरणीलायक क्षेत्र 64490 हेक्टर एवढे आहे . पेरणीलायक एकूण क्षेत्राच्या निम्मे पेक्षा जास्त क्षेत्र हे या वर्षी संकरीत कापूस लागवडीचे आहे. अर्थात यंदा 34275 हेक्टर एवढय़ा क्षेत्रावर संकरित कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. तालुक्यात यंदा 466.44 मिलिमीटर एवढाच पाऊस पडल्याने सरासरी ओलांडली गेली नाही. अशातच गेल्या चार दिवसांपासून चोपडा तालुक्यात ढगाळ आणि धुक्याचे वातावरण असल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव संकरीत कापसावर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. सेंद्रिय अळी आणि ठिपक्यांची बोंड अळी अशा अळ्या सध्या प्रौढ अवस्थेत दिसून आल्याने या अळ्यांचा नाश कसा करावा ? हा प्रश्न शेतक:यांचा पुढे निर्माण झाला आहे. कारण या अळ्यांची अंडी किंवा त्या कोषावस्थेत दिसल्या असत्या तर कीटकनाशक फवारून त्यांचा नाश करता आला असता. मात्र बोंडांमध्ये अर्थात कै:यांमध्ये या अळ्या शिरल्याने त्यांना फवारणीतून नष्ट करणे शेतक:यांसमोर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. क्लोरोपायरीफॉस व क्युनॉल फॉस फवारा: कृषी अधिकारी दरम्यान, याबाबत तालुका कृषी अधिकारी डी.बी. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या तीन प्रकारच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसावर दिसून येत आहे.त्यासाठी क्लोरोपायरीफॉस आणि क्युनॉल फॉस या किटकनाश औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, बोंडअळीच्या नायनाटासंदर्भात गावोगावी पोस्टर लावण्यात येणार असून पीक रोग सर्वेक्षण योजना सुद्धा कापूस आणि सोयाबिनसाठी राबविण्यात येणार आहे.