स्वच्छता सुरक्षेची व्यवस्था, जेवणाची गुणवत्ता संमिश्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:57 PM2020-07-28T12:57:56+5:302020-07-28T12:58:06+5:30
रोज लागतात ५५० फूट पॉकेटस् : कोविड केअर सेंटरची स्थिती, तपासणीसाठी डॉक्टरांचा अभाव
जळगाव : महापालिकेकडून विलगीकरण कक्ष व कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून संशयित व सौम्य लक्षणे असलेले बाधित रुग्ण या ठिकाणी दाखल असतात. या कक्षांचे वास्तव तपासले असता स्वच्छता व सुरक्षेची चोख व्यवस्था आहे, जेवणाच बाबतीत मात्र, संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दोन दिवसांपूर्वी तर सायंकाळी मिळालेली खिचडी अनेक रुग्णांनी बाजूला ठेवून दिल्याची माहिती समोर आली आह़े
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चारही इमारती बाधितांसाठी राखीव आहेत. शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय आयटीआयच्या इमारतींमध्ये संशयित रुग्णांना ठेवले जाते़ सद्यस्थितीत डॉक्टरांची कमतरता हा या ठिकाणची सर्वात मोठी अडचण आहे़ अनेक डॉक्टर व तंत्रज्ञ बाधित झाल्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे़ मनुष्यबळाचा हा मुद्दा सोडविणे महापालिकेसमोरील मोठे आव्हान आहे़ डॉक्टरांकडून दिवसातून दोन वेळा तपासणी केली जात आहे.
रोजचे साडे पाचशे फूड पॉकेटस्
रेडक्रॉसकडे भोजन व्यवस्थेची जबाबदारी आहे़ ओसवाल मंगल कार्यालयात किचन तयार करण्यात आले आहे. रोजचे साडे पाचशे पॅकिट जेवण या ठिकाणाहून जात असते़ यासह सकाळी नाष्टा, चहा, दुपारी फळे, सायंकाळी चहा दिला जात आहे़, अशी माहिती देण्यात आली.
जेवणाचा मेनू
- डाळ, भात, भाजी, चपाती, कधी खिचडी-दुपारी एक वाजता तर सायंकाळी ६ ते साडे सात वाजेदरम्यान जेवण मिळते़
जमेच्या बाजू
-स्वच्छतेच्या बाबतीत बारकाईने लक्ष.
-सुरक्षेची पूर्ण काळजी, रुग्णांच्या नातेवाईकांना आत प्रवेश नाही
-आता बाहेरून येणाऱ्या वस्तूही पूर्णत: बंद, घरचे जेवणही बंद
-हवे तेव्हा गरम पाणी उपलब्ध असते़
-खोकला, सर्दी असा कसलाही त्रास असल्यास खालीच औषधी उपलब्ध होतात़
-एक वेळ फळे दिले जातात़
-नाश्त्यात विविध पदार्थ असतात
काही तक्रारी : भाजी तिखट असणे, चपात्यांची गुणवत्ता खराब असणे, डाळ, भात व्यवस्थित नसणे, कधी कधी सायंकाळी अगदीच लवकर जेवण दिले जाणे, अशा काही तक्रारीही समोर आलेल्या आहेत़ खोकला असतानाही आंबट फळे देणे़़़