मीच माझा भाग्यविधाता -युपीएससी उत्तीर्ण अनिकेत सचान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 04:17 PM2020-08-06T16:17:08+5:302020-08-06T16:18:45+5:30
म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधाता’चा प्रत्यय सिद्ध केला आहे. कुठलीही ट्यूशन वा क्लास न लावता इंटरनेटचा सदुपयोग करून अनिकेतने हे शिखर गाठले.
वासेफ पटेल
भुसावळ : म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधाता’चा प्रत्यय सिद्ध केला आहे. कुठलीही ट्यूशन वा क्लास न लावता इंटरनेटचा सदुपयोग करून अनिकेतने हे शिखर गाठले.
भुसावळ येथील १५ बंगला भागात राहणारे रेल्वे कर्मचारी तिकीट निरीक्षक विनयकुमार सचान यांचे चिरंजीव तसेच मंजुषा सचान सरल, सभ्य व सुसंस्कृत आईने दिलेले संस्कार यातून घडून वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी अनिकेत हा अगदी पहिली वर्गापासून पाऊल टाकत होता. भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीत ९५ टक्के, तर बारावीत ९६.२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण आयआयटी बीएचयु वाराणसी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता करताच यूपीएससीच्या अभ्यासालाही सुरुवात केली होती. सन मे २०१९ मध्ये इंजिनीरिंगची परीक्षा दिल्यानंतर जून ते सप्टेंबर २०१९ फक्त चार महिने घरच्या घरी इंटरनेटचा सदुपयोग अभ्यासासाठी करून सचिनने युपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी उत्तीर्ण केली.
आयएएस अधिकारी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी दिले तीन मूलमंत्र
सर्वप्रथम ‘होय, मी करू शकतो’ स्वत:मध्ये असा आत्मविश्वास निर्माण करा. जो काही अभ्यास आपण करत आहोत त्याच्या आपल्या भाषेत स्वत:च नोट्स बनवा, अभ्यासानंतर त्या विषयाचा स्वत: वारंवार अंतिम परीक्षेसाठीचीच परीक्षा देत आहात अशा पद्धतीने, चाचणी परीक्षा देत चला. तसेच कोणत्याही एका विषयावर अभ्यास करताना एकाच स्त्रोतचा वापर करा. अनेक स्त्रोत वापरल्यास यामुळे गोंधळ निर्माण होतो. हे तीन मूलमंत्र अनिकेत सचान यांनी आयएएसचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांना दिले.
टी.एन.शेषन यांच्याकडून घेतली प्रेरणा
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांची काम करण्याची पद्धत पाहता, त्यांची प्रेरणा घेऊन अभ्यास सुरू ठेवल्याचे सचान यांनी सांगितले.
वडिलांचा प्रामाणिकता व आईचे संस्कार यातून घडलो
वडील विनयकुमार सचान हे तिकीट निरीक्षक असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. याशिवाय आई मंजुषा सचान यांनी संस्कार दिले. यामुळे खºया अर्थाने घडलो. लहानपणी वडिलांनी मी कलेक्टर, आयएएसची परीक्षा पास करून मोठा अधिकारी होणार याचे स्वप्न बघितले होते व आज वडिलांची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद गगनात मावेनासा असल्याचे सांगितले.
बहुतांश तरुण विद्यार्थी हे इंटरनेटचा चुकीच्या कामासाठी उपयोग करतात, मात्र इंटरनेटचा सदुपयोग केल्यास आपणास बारकाईने अभ्यास होऊ शकतो हे सचान यांनी सिद्ध करून दाखवले
दरम्यान, अधिकारी झाल्यानंतर देशातील शैक्षणिक व्यवस्था सुदृढ करून ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.