होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:54 AM2023-02-25T10:54:06+5:302023-02-25T10:56:30+5:30

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

i betray for Maratha face like Eknath Shinde to become Chief Minister says Gulabrao Patil | होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील

होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील

googlenewsNext

जळगाव

गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते. 

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट कबुलीच दिली. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला. 

"तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली", असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील असो की शिंदे गटाचे इतर आमदार यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Web Title: i betray for Maratha face like Eknath Shinde to become Chief Minister says Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.