न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणणारेच खात आहेत : आमदार विद्या चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:40 PM2018-12-07T16:40:06+5:302018-12-07T16:48:26+5:30
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शेंदुर्णी येथील जाहीर सभेत केले.
शेंदुर्णी : ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शेंदुर्णी येथील जाहीर सभेत केले.
नगरपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व रिपाई (कवाडेगट) उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या वाचनालय चौकात जाहीर सभेत चव्हाण बोलत होत्या. चव्हाण यांनी सुरुवातीलाच जलसंपदामंत्री गिरीष महाजनांवर टिका करतांना सांगितले की, कमरेला बंदूक लाऊन हे सभागृहात येतात. पैशाच्या जोरावर निवडणुक जिंकण्याचे स्वप्न पाहणाºया भाजप शिवसेनेला सरकारला सत्तेतुन बाहेर फेका असे आवाहन त्यांनी केले.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, नासिक येथील काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील, पहुरचे प्रदीप लोढा, डि.के.पाटील, संजय गरुड, विलास पाटील यांनी भाषणात आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार क्षितीजा गरुड, जि.प.सदस्या प्रमिला पाटील, सरोजीनी गरुड, सागरमल जैन, शांताराम गुजर, सुधाकर बारी यांचेसह उमेदवार व पदाधिकारी उपस्थीत होते. दरम्यान, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी पाच वाजता शेंदुर्णीत सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.