"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 04:20 PM2023-01-07T16:20:28+5:302023-01-07T16:20:59+5:30

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

"I kicked Owaisi's dogs in the assembly"; Minister Gulabrao Patal's tongue slipped | "ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

Next

प्रशांत भदाणे

जळगाव : "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं", असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आज जळगावात केलंय. राज्यात आधीच वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकारण तापलेलं असताना मंत्री गुलाबराव पाटलांनी एमआयएमच्या आमदारांना उद्देशून केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याचा शक्यता आहे.

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण जर कुणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्ही काय गांधीजी नाहीत. या गालावर मारलं म्हणून त्या गालावर मारा. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितले होते. हे आपल्याला माहिती आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली-

आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की कुणीही आमच्यावर चालून जावं. हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली. इस मार्ग की सभी लाईन व्यस्त हैं, थोडी देर बाद डायल करे, सीधा गुवाहाटी... बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व सुटू नये म्हणून आज मी तुमच्यासोबत आहे. मार्ग बदलल्यानंतर आमच्यावर खूप टीका झाली, आम्हाला ट्रोल केलं गेलं. पण आम्ही सत्तेसाठी मार्ग बदलला नाही तर हिंदुत्व वाचवण्यासाठी बदलला. सत्तेसाठी सतरा शे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असंही गुलाबराव म्हणाले.

संजय राऊत यांच्यावरही टीका...

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. आमच्यावर खूप टीका होतं आहे, संजय राऊत पण आमच्यावर टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते. संजय राऊत यांना जी 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली. आपण पक्ष बीक्ष बाजूला ठेवू, जर धर्मच टिकला नाही तर पक्ष कुठं वाचणार आहे तुमचा, असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: "I kicked Owaisi's dogs in the assembly"; Minister Gulabrao Patal's tongue slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.