मी गिरीश महाजन यांना भेटलो, पण मतदार संघाच्या कामासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 09:10 PM2019-08-08T21:10:59+5:302019-08-08T21:32:04+5:30

भाजपात जाणार नाही : देवकर यांची स्पष्टोक्ती

 I met Girish Mahajan, but for constituency work | मी गिरीश महाजन यांना भेटलो, पण मतदार संघाच्या कामासाठी

मी गिरीश महाजन यांना भेटलो, पण मतदार संघाच्या कामासाठी

Next



धरणगाव : होय, मी गिरीश महाजन यांना भेटलो. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मतदारसंघातील काही विकास कामांसंदर्भात माझी ती भेट होती. मात्र मिडियाने कुठलीही शहानिशा न करता मी भाजपात प्रवेश करणार असल्याची वल्गना केली. भेटीचा चूकीचा अर्थ काढल्याने माझे मन खिन्न झाले असून मी राष्ट्रवादीचा एक जबाबदार माजी मंत्री असून कदापी राष्ट्रवादी सोडणार नाही अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव येथील राष्ट्रवादी कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
महापूर मदतीसाठीसत्ताधारी अपयशी
अती पर्जन्यामुळे महाराष्ट्रात आलेला महापूर जनजीवन उध्वस्त करणारा आहे. अश्या गंभीर परीस्थितीतही सत्ताधारी भाजप-सेना महाजनादेश यात्रेत फिरत होते. त्यांचा निषेध करत माजी मंत्री गुलाबराव देवकर ,जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी शासन मदत कार्यात अपयशी ठरले असा आरोप केला.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगीत...
महापूराच्या सद्यस्थितीमुळे शिवस्वराज्य यात्रा रद्द केल्याचे त्यांनी यावेळी घोषीत केले. केंद्र सरकारने घेतलेल्या ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय स्तुत्य असला तरी त्याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर कोणताही परीणाम होणार नाही असहीे ते म्हणाले. ही निवडणूक राज्याशी संबधीत असल्याने जनता युती शासनाविरुध्दचा आपला रोष व्यक्त करेल असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे,तालुका अध्यक्ष धनराज माळी , रमेश माणिक पाटील, माजी जि.प.सदस्य रविंद्र पाटील , ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील ,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पाटील ,अरविंद देवरे , संभाजी कंखरे ,लक्ष्मण पाटील, गोपाळ पाटील ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  I met Girish Mahajan, but for constituency work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.