जळगावच्या तरुणाचा इचलकरंजीत खून
By Admin | Published: May 6, 2017 04:37 PM2017-05-06T16:37:15+5:302017-05-06T16:37:15+5:30
7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 6 - शालकाच्या लगAाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या बबलू सुभाष नवले (वय 33 रा. जळगाव) या तरुणावर इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता 7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बबलू याला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर, इचलकरंजी पोलीस स्टेशनला कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य 4 ते 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बबलू नवले याच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, बबलू याचा शालक विशाल विनायक नेतलेकर (रा. जळगाव) याचे 8 मे रोजी इचलकरंजी येथे लगA आहे. मुलगी इचलकरंजी येथील असल्याने लगA सोहळा तिच्याकडे आयोजित करण्यात आला आहे. या लगAाची पत्रिका वाटपासाठी बबलू व त्याची मेहुणी लक्ष्मी असे दोघं जण 2 मे रोजी रेल्वेने जळगाव येथून गेले होते.
चुलत शालकाचा होता जुना वाद
कोल्हापूर, सातारा, नीर, ता.बारामती येथे पत्रिका वाटप झाल्यानंतर बबलू व त्याचा चुलत शालक रोहन सावंत हे दोन्ही जण शुक्रवारी दुचाकीने इचलकरंजी परिसरातील पत्रिका वाटपाचे काम करीत असताना रात्री साडे नऊ वाजता दकनूर चौकात रोहन व कुणाल सावंत यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये यापूर्वीही वाद होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बबलूवर काही जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. बबलू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी तातडीने बबलूला इचलकरंजी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर कोल्हापूरला हलविण्यात आले.
सात जणांविरुध्द गुन्हा
या घटनेप्रकरणी कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य पाच जण अशा सात जणांविरुध्द रात्रीच इचलकरंजीतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनला कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी बबलूची प्राणज्योत मालवल्याने खुनाचे कलम वाढविण्यात येतील असे ठाणे अमलदाराने सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक नरळे करीत आहेत.
घटनास्थळावरून जळगावला केला फोन
ही घटना घडल्यानंतर तेथील कंजरभाट समाजाचे नेते जयराज भाट यांनी जळगाव येथे नरेश बागडे यांच्याशी रात्री दीड वाजता फोन करून माहिती दिली. त्यानंतर बागडे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे व सचिन बाटुंगे असे समाजबांधव शनिवारी इचलकरंजी येथे रवाना झाले. दरम्यान, या घटनेमुळे विशालचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
बबलू रोजगारासाठी आला जळगावात
बबलू याचे मूळ गाव नीर, ता.बारामती आहे. त्याचे आई व वडील गावाकडेच असतात. रोजगारानिमित्त तो काही वर्षापासून जळगावात स्थायिक झाला होता. प}ी नूतन, मुलगी दर्शन (वय 8), मुलगी जान्हवी (12) व वैष्णवी (वय 10) यांच्यासह बबलू तांबापुरा, कंजरवाडा येथे राहत होता.