जळगावात हुंडा पद्धत झुगारून भोई समाजात आदर्श विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 05:28 PM2017-12-13T17:28:44+5:302017-12-13T17:35:32+5:30
साखरपुडा पद्धतीलाही दिली तिलांजली
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.१३ : जळगाव येथील नामदेव जावरे व लोहारा येथील उत्तम भोई या दोघा कुटुंबीयांनी हुंडा या अनिष्ठतेला फाटा दिला. जळगावातील हटकर समाज मंगल कार्यालयात भोई समाज बांधव व इतर समाजातून उपस्थित वºहाडीत १० डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. साखरपुडा पद्धतीलाही तिलांजली देण्यात आली. त्यामुळे हा विवाह सोहळा भोई समाजासह इतर समाजासाठी आदर्श ठरणार आहे.
समाजात मुलींचे महत्त्व पटत असतानाही अनेक समाजात हुंडा घेणे पिढीजात श्रीमंतांनी प्रतिष्ठेची बाब बनवली आहे. मुलगी विवाहयोग्य होण्याचे वय येऊ लागताच तशी चिंता अनेकांना मिळत्या जुळत्या परिस्थितीने अनेक पालकांना सतावू लागते. त्याचे कारण म्हणजे समाजाला लागलेली हुंडा पद्धतीची कीड ही आजही समाजात सुरू आहे. याचे बळी ठरतात ते गरीब. वधूकुटुंबातील सदस्यांच्या पुढाकाराने समाजप्रबोधन करणारे मुलीचे काका अर्जुन रामचंद्र भोई, एस.ए.भोई यांनी कार्याचा गौरव केला. विवाहस्थळी श्यामराव बावणे, अशोक मोरे, आनंदा शिवदे, दशरथ लांबोळे, सुखराम सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, रामाजी बावणे, रवींद्र भोई, महारू शिवदे, यशवंत भोई, पारस मोरे, प्रकाश जावरे, भिवसन घाटे, विठ्ठल घाटे यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सुरत, औरंगाबाद, बुलडाणा, बुºहाणपूर, इंदूर या जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.