भुसावळात मूकबधिर वधू-वराचा आदर्श विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 07:11 PM2017-11-22T19:11:46+5:302017-11-22T19:18:04+5:30
बदल : झुंझार लेवा मंडळाचे सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : लेवा पाटीदार समाजातील मूकबधिर वर व वधूचा विवाह डॉ.व्ही.बी. खाचणे सभागृहात २१ रोजी थाटात पार पडला. विशेष म्हणजे वधू-वर दोघे ही उच्च शिक्षित आहे. समाजाला प्रेरणा देणाºया या दाम्पत्यास झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाने संसारोपयोगी वस्तुंसाठी ११ हजार रुपयांची मदत दिली आहे. वर जयेश प्रकाश भिरुड (रा.डोंगर कठोरा, ह.मु.नागपूर) यांचे शिक्षण आयटी इंजिनिअरिंग झाले आहे. ते बंगलोर येथे बँकेत नोकरीस आहे. ते मूक व बधिर आहे तर वधू-सुरूची किशोर पाटील (रा.कन्हाळा, ह.मु.भुसावळ) हिचे शिक्षण बी.कॉम. झाले आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई भुसावळ येथे जिल्हा बँकेत नोकरीस आहे. वधू सुरूची ही भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील यांची भाची आहे. या आदर्श विवाहास झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.