आयडीयाच्या कल्पनांना दाद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:14 PM2019-01-19T23:14:21+5:302019-01-19T23:14:53+5:30
नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार
आविष्कार, विज्ञान प्रदर्शन तसेच इन्स्पायर अवॉर्ड या सारख्या संशोधनात्मक प्रदर्शनामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविणारे विद्यार्थी...त्यांच्या हटके संकल्पना, ज्ञानाची आदानप्रदान करण्यासाठी सुरू असणारी चढाओढाची मेजवानीच बघायला मिळाली़ आपल्या उत्कृष्ट सादरीकणांमुळे बालवैज्ञानिकांपासून तर अभियांत्रिकीची विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आयडीयाच्या कल्पनांना दाद मिळवून घेतली़ मात्र, विद्यार्थ्यांचे संशोधन हे प्रदर्शनापुरतेच मर्यादीत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संशोधनवृत्तीला पाठबळ देण्यासाठी विद्यापीठ असो किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी प्रयत्न केले पाहिजे़
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रशाळास्तरीय, विद्यापीठस्तरीय आविष्कार प्रदर्शन झाले़ यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना सुचलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवून त्यांची मॉडेल्स तयार केले़ दुचाकीपासून तयार केलेली कार तर दातांच्या कंपनपासून कर्णयंत्र सोबतच केळीच्या खोडात शेती यासह हटके प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले़ त्यांनी दाद देखील मिळवून घेतली़ मात्र, या प्रकल्पांना प्रत्यक्षात बाजारात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे़ पणे तसे काही दिसून येत नाही़ यामुळे महाविद्यालयपुरताच हे संशोधन अडकून राहते़ नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून विज्ञान प्रदर्शन आणि इन्स्पायर अवॉर्ड हे बालवैज्ञानिकांच्या आयडींयांना चालणा मिळावी यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात पाचवीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काय करता येईल यावर भर दिलेले प्रयोग सादर केले़ एकापेक्षा एक उत्कृष्ट प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले़ यातील काही विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरील प्रदर्शनासाठी देखील निवड झाली़ परंतू, राज्यस्तरावर प्रदर्शन झाल्यानंतर विद्यार्थी देखील संशोधनपासून दूर होतात, आणि त्यांच्यातील संशोधन वृत्ती पुन्हा कमी होती़ त्यामुळे यासाठी प्रत्यक्षात उपाययोजना करणे महत्वाचे आहे़ यासाठी विशिष्ट कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच त्यांनी केलेल्या संशोधनात काही वेगळे आणि करता येईल का? यावर काही सुचना़ बालवैज्ञानिकांच्या कल्पनांना प्रयोगशाळांमध्ये वापर करून त्यांना देखील त्यात समावेश करावा, जेणे करून संशोधनाला चालना मिळून भविष्यात उत्कृ ष्ट वैज्ञानिक देशाला मिळेल़